शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

पनीर खाण्याचे फायदे माहित असतील, आता जाणून घ्या तोटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 15:49 IST

पनीर हा पदार्थ सगळ्यांच्या घरी आवर्जून खाल्ला जातो. दुधापासून तयार करण्यात आलेलं पनीर अत्यंत पौष्टीक असतं.

पनीर हा पदार्थ सगळ्यांच्या घरी आवर्जून खाल्ला जातो. दुधापासून तयार करण्यात आलेलं पनीर अत्यंत पौष्टीक असतं. यात फॅट्स पण असतात. अशावेळी आपल्या आहारात पनीरचा योग्य पद्धतीनं वापर कसा करावा. हे माहिती असणं आवश्यक आहे. पनीरमुळे प्रथिनं मिळतात. पनीरमध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, झिंक सुद्धा चांगल्या प्रमाणात असतं. पनीर खाणं सर्वांसाठी आरोग्यदायी असतं.  तसेच ज्या लोकांच्या शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण  वाढलेलं असतं, त्यांना प्रोटीन न खाण्याचा सल्ला दिला जातो. जे नियमीत व्यायाम करतात त्यांनी पनीर खाणं गरजेचे असतं. मात्र ते कधी आणि किती प्रमाणात खायला हवं, तर जाणून घ्या पनीर किती आणि कधी खावं. 

 पनीरचे नियमित सेवन केल्याने शरीरातील रक्त वाढतं. लिव्हर मजबूत राहतं. वाढत्या वयासोबत उद्भवणाऱ्या समस्यांपासून बचाव करण्यात पनीरचे सेवन फायदेशीर ठरतं. पनीरचे नियमीत सेवन केल्याने सांधेदुखीची समस्या दुर राहते. पनीर एका दिवसात २०० ग्रॅमहून अधिक खाऊ नये. एका वेळेत १०० ग्रॅम पनीर पुरेसं असतं. रात्री उशीरा पनीर खाऊ नये. पनीर नेहमी वेगवेगळ्या भाज्यांसोबत मिक्स्ड करून खावं. त्यातील प्रोटीन आणि फायबरमुळे आपलं पोट खूप वेळेसाठी भरलेलं जाणवतं. आणि ते शरीरात खूप चांगल्या पद्धतीनं पचवल्या जातं. पनीर आणि हंगामी भाज्या बरोबर प्रमाणात खाव्या, कारण पनीरमध्ये सोडियमचं प्रमाण खूप असतं जे भाज्यांमध्ये असलेल्या पोटॅशिअमसोबत मिसळून हाय फायबर डाएटमध्ये रूपांतरीत होतात.

(Image credit-Olive magazine)

पनीर खाण्याचे फायदे आणि तोटे

१) पनीर खाल्ल्याने शरीरास उर्जा मिळते. आणि हेल्दी  फुडमध्ये पनीरचा समावेश होतो.२) पनीरचे सेवन केल्यास आजारांपासून दूर राहता येतं३) पनीरमध्ये प्रोटिन्स असतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर खाल्ल्याने भुकेवर नियंत्रण राहते.

४) शरीरातील फॅट्स कमी होऊन वजन कमी होते. कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करा.५) पनीरमध्ये कॅल्शियमही जास्त असल्याने दात आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला. तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीरमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने ज्यांना हृदयरोग, मधुमेह किंवा इतर काही त्रास असतील त्यांनी पनीर डॉक्टरांच्या सल्ल्याने पनीर खावे.६) पनीर जास्त खाल्ल्यास कॉलेस्ट्रोल वाढण्याचा धोका असतो.७) कच्चा पनीर खाणं हे गरोदर महिलांसाठी नुकसानकारक ठरू शकत.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य