शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जीने चढताना दम लागतो? दुर्लक्ष कराल तर पडेल महागात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 10:42 IST

आपण सध्याच्या काळातील वातावरण पहिलं तर शारीरिक श्रम घेणारे लोक खूप कमी असतात.

आपण सध्याच्या काळातील वातावरण पहिलं तर शारीरिक श्रम घेणारे लोक खूप कमी असतात. मोठमोठ्या शहरात तसंच उपनगरात ८ ते ९  तास बसून काम करणारे लोकं आपल्याला दिसतात. तंत्रज्ञानामुळे आपली सगळी कामं सुखकर आणि सोपी झाली आहेत. असं आपण म्हणतो. पण लहान सहान गोष्टी करण्यासाठी सुद्धा आपल्याला तंत्रज्ञानावर  अवलंबून राहवं लागतं. 

तुम्ही प्रत्येकवेळी  लिफ्टचा वापर करून ठरावीक ठिकाणी पो़होचता. हेच जर तुम्हाला चालत जायला लागलं तर दम लागणे, पाय दुखणे. अशा समस्यांचा सामना तुम्हाला करावा  लागतो. हे संकेत  हृद्याशी निगडीत असलेल्या समस्येचे असू शकतात.  तुम्हाला जर जीने चढताना जास्त घाम असेल तर हार्ट अर्टकचा येण्याचा धोका असू शकतो.  कारण अनेकांना दम लागण्याची समस्या सर्वाधिक जाणवते. 

जर तुम्हाला हाय कॉलेस्ट्रॉल, हाय बीपी किंवा लठ्ठपणा, मधुमेह  यांपैकी कोणतीही समस्या आहे तर तुम्हाला दम लागण्याचा त्रास जास्त होत असेल तर  तुम्हाला डॉक्टरकडे वारंवार तपासणी करण्याची गरज आहे. जेणेकरून तुम्ही भविष्यात हृदयाविषयी येणार असलेल्या समस्यांना आधीच रोखू शकता. तरी सुद्धा जर तुमच्या छातीत दुखतं असेल तर ते हार्ट अर्टकचं लक्षण  आहे. असं म्हणता येणार नाही.  पण सगळ्यात जास्त हार्ट अर्टकच्या केसमध्ये  छातीत दुखण्याचा त्रास सर्वाधिक उद्भवतो.  हे दुखणे फार असह्य असते. पोटाच्या डाव्या बाजूला दुखण्यचा त्रास उद्भवतो. 

जर तुम्हाला छातीत दुखण्यासोबतच खूप घाम सुद्धा येत असेल. तर याकडे दुर्लक्ष करू नका. कारण यावेळी जर तुम्हाला थंड घाम येत असेल तर आरोग्यासाठी  धोकादायक ठरू शकतं. व्यायाम करताना जर तुम्हाला श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर हे हार्ट संबंधीत आजाराचं लक्षणं असू शकतं.

वारंवार तुमचं डोकं दुखत असेल तर तुम्हाला तपासणी करणं आवश्यक आहे. कारण हार्ट संबंधी काही आजार उद्भवत असेल तर मेंदूला रक्तपूरवठा व्यवस्थीत होत नसतो. त्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. जर रोज तुम्ही सहजतेने जीने चढत असाल आणि दम लागण्याचा त्रास होत असेल तर तुम्हाला शारीरिक व्यायाम आणि हालचालीची गरज आहे. तसंच वेळोवेळी मेडीकल चेकअप केल्यास होणार असलेल्या आजारांपासून वाचता येईल. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स