मिरच्या खाल्ल्याने कमी होतो हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 05:30 PM2019-12-19T17:30:31+5:302019-12-19T17:43:08+5:30

मिरची हा स्वयंपाक घरात वापरला जाणारा पदार्थ आहे. काही लोकांच्या आहारात मिरच्यांचे प्रमाण अधिक असते.

Know the benefits of chilly to health | मिरच्या खाल्ल्याने कमी होतो हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या रिसर्च

मिरच्या खाल्ल्याने कमी होतो हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या रिसर्च

googlenewsNext

मिरची हा स्वयंपाक घरात वापरला जाणारा पदार्थ आहे. काही लोकांच्या आहारात मिरच्यांचे प्रमाण अधिक असते. तर काही लोक अगदी कमी प्रमाणात मिरची तसंच मसाल्यांचं सेवन करतात. इटलीच्या वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. त्यांचा निदर्शनास असे आले की जी लोकं आठवड्यातून चारपेक्षा जास्तवेळा मसाल्याचे पदार्थ खातात. त्यांच्यात हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्यांची संख्या ४० टक्के कमी होती. तेच मिरची न खाणाऱ्या लोकांमध्ये आजारांचे प्रमाण जास्त होते. या संदर्भातील माहिती ही अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजी या पुस्तकात नमुद करण्यात आली आहे.

या अभ्यासानुसार मागिल ८ वर्षापासून इटलीच्या पॉरज़िल्ली मध्ये न्यूरोमेड न्यूरोलॉजिकल इंस्टीट्यूट येथिल तज्ञांनी  हेल्दी आणि अन्हेल्दी आहार घेत असलेल्या लोकांचे निरीक्षण केले. ज्यात असं दिसून आलं की मिरची खाणारे लोक हे मिरची न खाणाऱ्यांच्या तुलनेत अधिक सुदृढ आहेत. तसंच हिरवी मिरची आपल्या पचन तंत्रासाठी खूप लाभदायक आहे. आपल्या अन्नामध्ये फायबर अधिक प्रमाणात आढळते. तसंच हिरव्या मिरचीमुळे त्वचा साफ राहते. त्यामुळे, पिंपल्सपासून दूर राहण्यास मदत होते. 

 तसंच हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन बी६, लोह, पॅाटेशियम, आणि कर्बोदकाचा समावेश असतो. ज्यामुळे शरीराला त्याचा फायदा होतो .मधुमेहाच्या रुग्णांसाठी मिरची खाणं गरजेचे आहे. जर तुमची शुगर लेव्हल वाढली असेल तर ती कमी करण्यास मदत होते. त्याचबरोबर शरीरातील फॅट कमी करुन मेटाबॅालिजम वाढवते. त्यामुळे मिरची शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी लाभदायक ठरते.

Web Title: Know the benefits of chilly to health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.