शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

टाईमपास म्हणून ओठांची किंवा बोटांची त्वचा कुरतडता का? हा आहे स्किन पिकिंग आजाराचा संकेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 10:32 IST

केस, नखं आणि त्वेचेवर  हे स्किन पिकिंग होत. जेव्हा जखम झाल्यानंतर इन्फेक्शन होत. त्यावेळी खाज येत असते. तेव्हा हा प्रकार वाढत जातो. 

(image credit-adobe stock)

साधारणपणे अनेक लहान मोठे आजार असे असतात. जे अनेकदा उद्भवतात पण आपल्याला त्याची कल्पना सुद्धा नसते. तुम्ही कधीतरी पाहिलं असेल की अनेक लोक बसल्याबसल्या आपल्या ओठांची कातडी काढत असतात. किंवा नखांच्या आजूबाजूची त्वचा खेचतं असतात. मेडिकलच्या परीभाषेत याला स्किन पिकिंग डिर्सोडर असं म्हणतात. पिंपल्स  झाल्यानंतर सतत त्या जागेला हात लावणे.  त्या भागातील घाण साफ करण्यासाठी सतत त्या जागी कोरणे, किंवा कोणतंही कारण नसताना जर आपण त्वचेला स्पर्श करत असू तर एकाप्रकारे स्किन पिकिंग डिसॉर्डरचा धोका असतो. त्यात सगळ्यात कॉमन दिसून येत असलेले म्हणजे ओठांची त्वचा जर कोरडी झाली असेल तर नखांनी कुरतडणे.

(image credit- health essential)

तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही पण अनेक लोक आपला दिवस स्किन पिकिंग करण्यात घालवतात. अशात ब्लिडिंग सुद्धा होतं किंवा दुखण्याचा त्रास जाणवतो. स्किन पिकिंगची एकदा सवय लागली तर कितीही प्रयत्न केला तरी ही सवय मोडता येत नाही. पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये ही समस्या सगळ्यात जास्त दिसून येते. स्किन पिकिंग या आजाराची लक्षणं पुढिलप्रमाणे आहेत. 

त्वचेला सतत हात लावणे.

जखमेला सतत कोरणे.

ताण तणाव आणि कोणतंही काम करत असताना लक्ष त्वचेकडे असणे.

केस, नखं आणि त्वचेवर  हे स्किन पिकिंग होतं. 

जेव्हा जखम झाल्यानंतर इन्फेक्शन होत. त्यावेळी खाज येत असते. तेव्हा हा प्रकार वाढत जातो. 

अनेकदा लोक नखांच्या आजूबाजूची त्वचा काढायला सुरूवात करतात. कारण नखांच्या आजूबाजूच्या त्वचेला खाजवल्यामुळे लोकांना सॅटिस्फिकेशन मिळत असतं. बायोलॉजीकल आणि इंवारमेंटल गोष्टी या स्थितीला जबाबदार असतात. स्किन पिकिंग डिसॉर्डरच्या ट्रिटमेंटसाठी मेडिकेशन, थेरेपीचा वापर केला जातो. या ट्रिटमेंटच्या सहाय्याने तुम्ही या सवयींपासून सुटका मिळवू शकता.  स्ट्रेस मॅनेजमेंट्च्या सहाय्याने सुद्धा तुम्ही स्वतःला या आजारापासून लांब ठेवू शकता. ( हे पण वाचा-दूध की ज्यूस...सकाळचं पहिलं ड्रिंक म्हणून काय हेल्दी ठरेल?)

(image credit- web MD)

अशी घ्या काळजी

जेव्हा तुम्ही घरी असाल तेव्हा स्किन पिकिंग करण्याची इच्छा झाल्यास स्वतःला कंट्रोल करा.  

त्वचेची काळजी घेण्यासाठी नारळाच्या तेलाचा किंवा एलोवेरा जेलचा वापर करा. 

नियमीत व्यायाम करा. 

ताण-तणाव स्ट्रेस कमी करण्यासाठी योगा करा. ( हे पण वाचा-रात्री येणाऱ्या खोकल्यामुळे झोपेचं खोबरं होऊ द्यायचं नसेल तर वेळेवर करा 'हे' सोपे उपाय!)

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स