शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

किडनी स्टोन झाल्यावर शरीर देतं हे संकेत, जाणून घ्या कोणते पदार्थ ठरतील फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 10:12 IST

खरंतर हा त्रास होऊ नये यासाठी आधीच याची लक्षणे काय असतात याकडे लक्ष देणे फायद्याचे ठरेल. जेणेकरुन वेळेवर उपचार घेऊन ही समस्या दूर करता येईल.

Kidney Stone Symptoms : खाण्या-पिण्यातील अनियमीतता आणि आवश्यक तेवढं पाणी न पिणे ही किडनी स्टोन होण्याची मुख्य कारणं आहे. मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन अनेकांना होतो पण काहींच्या किडनीमध्ये तयार झालेला स्टोन सहज बाहेर पडतो. मात्र, काहींचा स्टोन मोठा असल्याने तो बाहेर पडण्यास अडचणी येतात. त्यामुळे काही लोकांना फार जास्त त्रास सहन करावा लागतो. खरंतर हा त्रास होऊ नये यासाठी आधीच याची लक्षणे काय असतात याकडे लक्ष देणे फायद्याचे ठरेल. जेणेकरुन वेळेवर उपचार घेऊन ही समस्या दूर करता येईल. चला जाणून घेऊया किडनी स्टोनचे काही संकेत. 

सुरुवातीची लक्षणे

किडनी स्टोनमुळे पाठीच्या खालच्या भागात फार जास्त वेदना होतात. हा त्रास काही तास किंवा काही मिनिटांसाठीही होऊ शकतो. यात वेदना होण्यासोबतच जीव मळमळणे किंवा ओमेटींगही होऊ शकते. खूप जास्त घाम येणे, लघवी करताना त्रास होणे असेही प्राथमिक लक्षणे आहेत. 

लघवीतून रक्त

किडनी स्टोनची समस्या असणाऱ्या लोकांना नेहमी गुलाबी, लाल रंगाची लघवी येऊ लागते. आणि स्टोनचा आकार वाढल्याने मूत्रमार्ग ब्लॉग होतो. किडनी स्टोन झालेल्या लोकांच्या लघवीतून कधी कधी रक्तही येतं. 

सतत लघवीला जावे लागणे

किडनी स्टोनने ग्रस्त लोकांना सतत त्रास होण्यासोबत लघवीला जावं लागतं. असं किडनी स्टोन मूत्रमार्गातून मूत्राशयात गेल्यावर होतं. ही गोष्ट फारच त्रासदायक असते. यामुळे असह्य असा त्रास होतो. 

पाठदुखी

तीव्र वेदना होणं ही कि़डनी स्टोनने ग्रस्त लोकांसाठी सामान्य बाब आहे. खासकरुन कंबर आणि कबंरेखालील भागात खूप जास्त असह्य वेदना होतात. या वेदना काही मिनिटांसाठी किंवा काही तासांसाठीही होऊ शकतात. 

मळमळ होणे आणि ओमेटींग

पोटात कसंतरी होणे आणि मळमळ होणे हे किडनी स्टोनचे सुरुवातीचे संकेत आहेत. अनेकदा ओमेटींगही होते. 

लघवीतून दुर्गंधी येणे

किडनी स्टोन झाल्यास लघवीचा रंग लालसर येतो आणि दुर्गंधीही येते. 

बसल्यावर वेदना होणे

किडनी स्टोन वाढल्याने त्या भागात वेदना होऊ लागतात. त्यामुळे त्या लोकांना बसायला त्रास होतो. इतकेच काय तर ते कधी कधी आरामात झोपूही शकत नाही. 

ताप येणे आणि थंडी लागणे

किडनी स्टोनमुळे अनेकदा ताप येणे, थंडी वाजणे या समस्याही होतात. अशावेळी लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

किडनी आणि पोटावर सूज येणे

मोठ्या आकाराचे स्टोन हे मूत्रमार्ग ब्लॉक करतात. त्यामुळे किडनीवर वेदना देणारी सूज येते. त्यासोबतच पोट आणि कंबरेच्या भागातही सूज येते. 

या पदार्थांचं करा सेवन

जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तुम्ही रोजच्या डाएटमध्ये राजमा, कलिंगड, नारळाचं पाणी, कारलं, छास, मूळा, जांभळं यांचा समावेश करा. मूळा किडनी स्टोन दूर करण्यासाठी फार फायदेशीर मानला जातो. गाजरामध्ये कॅल्शिअम ऑक्सलेट असतं जे स्टोनला तोडण्याचं काम करतं. तुळशीचं सेवन केल्यानेही किडनी स्टोन लघवीच्या माध्यमातून बाहेर निघतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य