शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

किडनी स्टोनच्या रूग्णांनी चुकूनही खाऊ नये 'या' ३ गोष्टी, अधिक वाढू शकते समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 15:05 IST

Kidney Stone : जेव्हा रक्तात कॅल्शिअम, फॉस्फोरस, सोडिअमसहीत इतरही मिनरल्सचं प्रमाण वाढतं तेव्हा ते किडनीमध्ये जमा होऊन छोट्या छोट्या स्टोनचं रूप घेतात. ज्याला किडनी स्टोन म्हटलं जातं.

Kidney Stone : आजकाल किडनी स्टोनची समस्या फारच कॉमन झाली आहे. मात्र, या समस्येकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. किडनी शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी आहे. किडनीद्वारे शरीरातील रक्त फिल्टर होतं. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात. रक्त फिल्टर करत त्यातील सोडिअम, कॅल्शिअम आणि इतर मिनरल्सचे सूक्ष्म कणं लघवीसोबत शरीरातून बाहेर निघतात. पण जेव्हा रक्तात कॅल्शिअम, फॉस्फोरस, सोडिअमसहीत इतरही मिनरल्सचं प्रमाण वाढतं तेव्हा ते किडनीमध्ये जमा होऊन छोट्या छोट्या स्टोनचं रूप घेतात. ज्याला किडनी स्टोन म्हटलं जातं.

किडनी स्टोनची समस्या ही सामान्य मात्र गंभीर समस्या आहे. ही समस्या झाल्यावर खाण्या-पिण्याची खूप काळजी घ्यावी लागते. काही गोष्टी आहारातून काढव्या लागतात, कारण याने किडनी स्टोनची समस्या अधिक वाढू शकते. अशात आज आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की, किडनी स्टोन झाल्यावर काय काळजी घ्यावी.

मिठाचं सेवन कमी करा

शरीरात सोडिअम म्हणजे मिठाचं प्रमाण अधिक असेल तर याने लघवीमध्ये सोडिअमचं प्रमाण वाढतं. त्यामुळे जेवण करताना वरून मीठ घेणं टाळलं पाहिजे आणि सोडिअम असलेल्या इतर पदार्थांचं सेवनही कमी केलं पाहिजे. बाहेर जेवणामध्ये सोडिअमचं प्रमाण अधिक असतं. 

मांसाहार कमी करा

रेड मीट, चिकन, पोल्ट्री आणि अंड्यांमुळे शरीरात यूरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढतं. जास्त प्रमाणात प्रोटीनचं सेवन केल्याने लघवीमध्ये सायट्रेट नावाचं रसायन कमी होतं. सायट्रेटचं काम किडनी स्टोन रोखण्याचं असतं. त्यामुळे प्लांट बेस्ड प्रोटीनचं सेवन करा. प्रोटीन मिळवण्यासाठी केवळ मांसाहार करावा असं नाही तर वेगवेगळ्या डाळींमधूनही तुम्ही प्रोटीन मिळवू शकता. 

कोल्ड ड्रिंक आणि कॅफीन

कोल्ड ड्रिंक आणि कॅफीनचं सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या अधिक वाढू शकते. कारण यामुळे शरीरात डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. किडनी स्टोन असल्यावर जास्त चहा आणि कॉफी पिणं टाळलं पाहिजे. कोल्ड ड्रिंकचं सेवनही टाळलं पाहिजे. कोल्ड ड्रिंकमध्ये असलेल्या फॉस्फोरस अॅसिडने किडनीमध्ये स्टोनचा धोका वाढू शकतो.

किडनी स्टोन दूर करण्याचे उपायकिडनी स्टोनच्या उपचारासाठी अनेक प्रकारची औषधे बाजारात आहेत. त्यासोबतच ऑपरेशन करुनही यापासून सुटका मिळवली जाऊ शकते. मात्र, काही घरगुती उपायांनीही किडनी स्टोनपासून आराम मिळवू शकतात. चला जाणून घेऊया किडनी स्टोनवर काही घरगुती उपाय....

1) लिंबू आणि ऑलिव्ह ऑइल

वर्षानुवर्षे लिंबूचा रस आणि ऑलिव्ह ऑईल मिश्रित करुन गॉलब्लेडरच्या स्टोनसाठी सेवन केलं जातं. पण हा उपाय किडनी स्टोनसाठीही फायदेशीर आहे. लिंबाच्या रसात असलेलं सॅट्रिक अ‍ॅसिडमध्ये कॅल्शिअम बेस असलेल्या स्टोनला तोडण्याची क्षमता असते आणि पुन्हा स्टोन तयार होऊ देत नाही. हे मिश्रण तयार करण्यासाठी लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल समान प्रमाणात मिश्रित करा आणि दिवसातून तीन वेळा याचे सेवन करा. 

2) डाळिंब

डाळिंबाचा रस आणि बीयांमध्ये अ‍ॅस्ट्रीजेंट गुण असतात. जे किडनी स्टोनवर उपचारासाठी फायदेशीर असतात. जर तुमच्या किडनीमध्ये स्टोन असेल तर रोज एक डाळिंब खावं किंवा त्याचा रस फायदेशीर होऊ शकतो. यासोबतच डाळिंबाला फ्रूट सॅलडमध्येही मिश्रित करुन खाऊ शकता. 

3) कलिंगड

मॅग्नेशिअम, फॉस्फेट्स, कार्बोनेट आणि कॅल्शिअमपासून तयार झालेल्या किडनी स्टोनच्या उपचारासाठी कलिंगड फारच उपयुक्त आहे. कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असतं, जे किडनीसाठी फारच उपयुक्त आहे. पोटॅशिअम लघवीतील अ‍ॅसिड लेव्हल नियंत्रीत ठेवण्यासाठी मदत करतं. पोटॅशिअमसोबतच कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असतं, यामुळे स्टोन नैसर्गिक पद्धतीने शरीराबाहेर काढला जाऊ शकतो.

4) राजमा

राजम्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असतात. याला किडनी बिन्स नावानेही ओळखलं जातं. राजमा किडनी आणि ब्लेडरशी संबंधीत वेगवेगळ्या आजारांवर उपाचारासाठी फायदेशीर आहे. ज्या पाण्यात राजमा भिजवून ठेवला असेल ते पाणी प्यायल्यासही फायदा होतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य