शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य! २ इंच कापूनही वाढतच आहे जिभेचा आकार, 'या' दुर्मीळ समस्येचा करतोय हा मुलगा सामना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 13:12 IST

ओवेनचा जन्म ७ फेब्रुवारी २०१८ ला झाला होता. त्याची जीभ जन्मापासूनच मोठी होती. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता.

अमेरिकेतील ३ वर्षांचा मुलगा ओवेन थॉमस एक फार दुर्मीळ आजाराचा सामना करत आहे. या मुलाला Beckwith-Wiedmann सिंड्रोम म्हटलं जातं. ही एक अशी कंडीशन(Rare Condition) आहे ज्यात शरीराच्या काही अवयवांची अधिक वाढ होऊ लागते. ही कंडीशन १५ हजार मुलांपैकी एका मुलाला होते. ओवेनच्या केसमध्ये त्याची जीभ अधिक वाढत आहे. ओवेनची जीभ सामान्यापेक्षा चार पटीने जास्त लांब आहे.

ओवेन जेव्हा जन्माला आला होता तेव्हा त्याची आई थेरेसाने त्याच्या जिभेबाबत डॉक्टरांना विचारले होते. पण त्यांनी दुर्लक्ष करत सांगितलं होतं की, त्याची जीभ सूजली आहे म्हणून लांब आहे. मात्र, थेरेसाला नर्सने सांगितले होते की, तिने या मुद्द्यावर आणखी चौकशी करायला हवी. त्यानंतर डॉक्टरांनी टेस्ट सुरू केली आणि ओवेनला बीडब्ल्यूएसची समस्या असल्याचं समोर आलं.

ओवेनचा जन्म ७ फेब्रुवारी २०१८ ला झाला होता. त्याची जीभ जन्मापासूनच मोठी होती. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. अनेक रात्री झोपेत त्याचा श्वास रोखला जात होता. त्यामुळे तो उलटीही करत होता. या घटनेनंतर थेरेसा आणि तिचे पती घरी एक डिजिटल मॉनिटर घेऊन आले होते. ज्याने ओवेनचे हार्ट रेट आणि ऑक्सिजन लेव्हल चेक करत होते. याने काही असामन्य असेल याने त्यांना मदत मिळत होती. (हे पण वाचा : दारू न पिताच या महिलेला चढते नशा, लिवरही झालं खराब; कारण वाचून व्हाल अवाक्...)

थेरेसाने सांगितले की, या डिजिटल मॉनिटरमुळे त्यांना अनेकदा इशारा मिळाला. त्यांच्या मुलांना ऑक्सिजन मिळत नसेल तर याने संकेत मिळत होता. त्यामुळे या मशीनमुळे त्याचा अनेक जीव वाचला. थेकेसानुसार, ओवेनच्या कंडीशनमुळे त्याला कॅन्सर होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे दर तीन महिन्यांची त्याचा अल्ट्रासाउंड आणि ब्लड चेक केलं जातं.

ओवेनची एक सर्जरी ही झाली आहे. ज्यात त्याची दोन इंच जीभ कापली होती. यानंतर ओवेनची झोपेत झोपेत श्वास घेणं विसरण्याची समस्या दूर झाली आहे. ओवेनला सध्या जिभेमुळे काही रिस्क नाही. मात्र, डॉक्टर सांगतात की, त्याच्या जिभेची ग्रोथ अजूनही कमी झालेली नाही. ते एका ठोस उपायाच्या शोधात आहेत. ज्याने त्याच्या जिभेची ग्रोथ कमी केली जाईल. 

टॅग्स :AmericaअमेरिकाHealthआरोग्य