बाळांना अॅनिमियापासून ठेवा दूर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 16:28 IST
रक्ताची कमतरता होण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील लोह कमी होणे. यालाच अॅनिमिया म्हणतात. हा आजार लहानमुलांना कावीळ सोबतच होण्याची शक्यता असते.
बाळांना अॅनिमियापासून ठेवा दूर !
रक्ताची कमतरता होण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील लोह कमी होणे. यालाच अॅनिमिया म्हणतात. हा आजार लहानमुलांना कावीळ सोबतच होण्याची शक्यता असते. यात बाळाचा रंग पिवळा पडतो किंवा वेगाने श्वास घेतो. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन या आजारापासून बाळाला वाचवणे आवश्यक असते.काय उपाययोजना करालनिळे व बारीक डोळे, शौचातून रक्त येणे, कमकुवत नखे, भूक मंदावणे, थकवा, डोकेदुखी, पिवळी त्वचा व श्वास घेण्यात त्रास होणे आदी अॅनिमियाची सामान्य लक्षणे आहेत. असे आढळून आल्यास बाळाला रोज कोमट पाण्यात मध टाकून बाळाला पाजल्याने रक्ताच्या पेशी वाढतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने एक ते पाच वर्षांच्या अॅनेमिया झाल्यास बाळाला फोलेट व आयर्न वाढवणारे औषध दिले जाते. ते त्वरित घ्यावे. शिवाय लहान बाळाला पाच वर्षापर्यंत गायीचे दूध देणे टाळावे. गायीच्या दुधामुळे अॅनिमिया होण्याची शक्यता वाढते.