शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

या पावसाळ्यात आपलं मूल सारखं आजारी पडतंय?..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 16:18 IST

थोडीशी काळजी घेतली तर मुलांपासून दूर पळवता येतील आजार..

ठळक मुद्देमच्छर आणि इतर जीवजंतूंपासून मुलांची काळजी घ्या, मच्छरदाणीचा आवर्जुन वापर करा. मुलांना उकळून गार केलेले पाणी देणे केव्हाही उत्तम.पावसाळी वातावरणात मुलांना फार वेळ बाहेर आणि गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये. मुलांची वैयक्तिक स्वच्छताही या काळात खूपच महत्त्वाची.

- मयूर पठाडेपावसाळ्यातला तो सारखा पाऊस, चिकचिक, दमट वातावण.. अशा डल वातावरणात आपल्यालाही डल वाटायला लागतं, पण याच काळात आजारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. लहान मुलांनी तर दवाखाने अक्षरश: भरलेले असतात. हाच काळ असा आहे, ज्यावेळी डास, मच्छर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जीवजंतूंचीही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असते. कारण हाच काळ त्यांच्या वाढीसाठी खूपच पोषक असतो.मुलांची रोगप्रतिकारशक्ती पूर्णत: विकसित झालेली नसल्याने याच काळात हे जीवजंतू त्यांच्यावर आक्रमण करतात आणि लहान मुलं आजारांनी त्रस्त होतात.याच काळात मुलांची मोठ्या प्रमाणात काळजी घेणं गरजेचं असतं. अर्थात त्यासाठी फार काही करण्याची गरज नाही, पण काही महत्त्वाच्या आणि ठराविक गोष्टी केल्या तरी आपली मुलं या आजारांपासून दूर राहू शकतील आणि त्यांच्या आनंदी बागडण्यानं घरंही प्रफुल्लित राहू शकेल.काय काळजी घ्याल?1- पावसाळी वातावरणात मच्छरांपासून आपल्या मुलांना जपा. डासांपासून अनेक आजार पसरतात.२- या काळात अनेक आजारांनी थैमान मांडलेलं असतं. अ‍ॅलर्जिक आजार तर या काळात वाढतातच, पण कावीळ, व्हायरल फिवर, डेंग्यू, मलेरियासारखे आजारही मुलांना लगेच आपल्या कह्यात घेतात.३- मच्छरांपासून मुलांचं रक्षण करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर अवश्य केला जावा. मच्छर कोणत्याही प्रतिबंधक उपायांना दाद देण्यास फार लवकर शिकतात. त्यामुळे त्यांना अटकाव करणं फारच कठीण असतं. त्यामुळे मच्छरदाणी हा त्यातल्या त्यात सर्वोत्तम उपाय.४- या काळात पाणी दुषित झालेलं असतं. त्यामुळे डायरिया, टॉयफॉइडसारखे आजारही लगेच बळावतात. त्यासाठी मुलांना उकळून गार केलेले पाणी देणे केव्हाही उत्तम.५- शक्यतो पावसाळी वातावरणात मुलांना फार वेळ बाहेर आणि गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये. मुलांना इन्फेक्शन होण्यास वेळ लागत नाही.६- आपल्या आसपासचा परिसर तर स्वच्छ असावाच, पण मुलांची वैयक्तिक स्वच्छताही या काळात खूपच महत्त्वाची.या गोष्टींची काळजी घेतली तर आपलं मूल नक्कीच वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवील आणि त्यामुळे आपलं घरही हसतं, आनंदी राहील.