शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Heart attack: चेहऱ्याच्या 'या' भागातील दुखणे असु शकते हार्ट अटॅक येण्याचे लक्षण, त्वरित व्हा सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 15:30 IST

जबडा दुखणे हे देखील सौम्य हृदयविकाराचा झटक्याचे लक्षण देखील असू शकते. छातीत दुखणे, अस्वस्थता आणि घाम येणं अशी समस्या असेल तर ही देखील हृदयविकाराची लक्षणं असू शकतात. आपण कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये याविषयी जाणून घेऊया.

आपलं हृदय धडधडत राहील तोपर्यंत आपण जगाल. हृदयाची कोणतीही समस्या तुमचं आयुष्य कमी करू शकते. हल्ली ह्रदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याची समस्या कमी वयातच लोकांमध्ये वाढत आहे. हृदय शरीराला रक्तासोबत ऑक्सिजनचा पुरवठा करतं. अनेक वेळा खराब जीवनशैली, अनियमित खाणं, जास्त तेलकट-मसालेदार पदार्थांचं सेवन, व्यायाम न करणं, दिवसभर बसून राहणं, शारीरिक हालचाली कमी असणं किंवा नसणं, लठ्ठपणा, अति धूम्रपान, मद्यपान, तणाव, चिंता या कारणांमुळं हृदयाचे विकार होण्याचा (Cardiovascular Diseases) धोका वाढतो.

झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, जबडा दुखणे हे देखील सौम्य हृदयविकाराचा झटक्याचे लक्षण देखील असू शकते. छातीत दुखणे, अस्वस्थता आणि घाम येणं अशी समस्या असेल तर ही देखील हृदयविकाराची लक्षणं असू शकतात. आपण कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये याविषयी जाणून घेऊया.

जबडा दुखणेजबड्याच्या मागच्या भागात वेदना जाणवत असतील तर हे सौम्य हृदयविकाराचे लक्षण असू शकते. यामध्ये वेदना जबड्यापासून सुरू होऊन मानेपर्यंत जातात. ही वेदना खूप अचानक होते. तुम्हाला याची लक्षणे आधीच दिसत नाहीत.

हातात मुंग्या येणेहाताला वेदना जाणवणं किंवा हाताला मुंग्या येणे हे सौम्य हृदयविकाराचे लक्षण आहे. ही वेदना छाती आणि मानेपर्यंत वाढू शकते.

अचानक घाम येणेजर तुम्हाला रात्री अचानक घाम येऊ लागला तर हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. त्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यावेळी काळजी घेऊन घाम कशामुळे येतोय याची खात्री करून गरज असल्यास ताबडतोब रुग्णालयात जा.

धाप लागणे आणि चक्कर येणंपायऱ्या चढल्यानंतर जास्त धाप लागत असेल तर आपले हृदय नीट काम करत नाही, असे समजावे. याशिवाय श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे आणि छातीत दुखणे ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात.

ढेकर येणे आणि ओटीपोटात दुखणेपोटाच्या अनेक समस्या हार्ट अटॅकचे लक्षण असू शकतात. ढेकर येणं, पोटदुखी ही देखील सौम्य हृदयविकाराची लक्षणे आहेत. नेहमीपेक्षा वेगळी अशी काही लक्षणं जाणवत असेल तर खबरदारी घ्या.सिडीटी

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Attackहृदयविकाराचा झटका