शहरं
Join us  
Trending Stories
1
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
2
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
3
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
4
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
6
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
7
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
8
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
9
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
10
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
11
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
12
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
13
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
14
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
15
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
16
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
17
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
18
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
19
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
20
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

काविळ झाल्याची लक्षणे आणि कारणे, जाणून घ्या काय खाऊन होऊन शकता लवकर बरे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 11:28 IST

Jaundice symptoms and causes : 19 एप्रिलला वर्ल्ड लिव्हर डे पाळला जातो. या दिवशी लोकांमध्ये लिव्हरसंबंधी जागरूकता पसरवली जाते. यासंबंधी आजारांबाबत लोकांना सांगितलं जातं.

Jaundice symptoms and causes : काविळ म्हणजे पीलिया लिव्हरसंबंधी एक आजार आहे ज्यात त्वचा आणि डोळ्यांचा रंग पिवळा होतो. असं तेव्हा होतं जेव्हा शरीरात  बिलीरूबिन नावाच्या पिवळ्या पदार्थांच प्रमाण वाढतं. बिलीरूबीन पित्तासोबत मिक्स होऊन पचन तंत्रात जातं. जिथून हे जास्तीकरून विष्ठेच्या माध्यमातून शरीरातून बाहेर निघतं. जर बिलीरूबीन लिव्हर आणि पित्त नलिकांमधून लवकर बाहेर पडत नसेल तर ते रक्तात जमा होऊ लागतं. तसेच त्वचा, डोळ्यांमध्येही जमा होतं. ज्यामुळे काविळ होतो.

19 एप्रिलला वर्ल्ड लिव्हर डे पाळला जातो. या दिवशी लोकांमध्ये लिव्हरसंबंधी जागरूकता पसरवली जाते. यासंबंधी आजारांबाबत लोकांना सांगितलं जातं. अशात या निमित्ताने काविळ काय आहे, त्याची कारणे काय आणि त्यापासून बचावाचे उपाय आम्ही सांगणार आहोत.

काविळची लक्षण

त्वचेच्या रंगात बदल, डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसणे, ताप येणे, थंडी वाजणे, डार्क रंगाची लघवी येणे, मातीच्या रंगाची विष्ठा, त्वचेवर खाज, वजन कमी होणे, उलटी किंवा विष्ठेतून रक्त येणे, पोट दुखणे ही काविळची सुरूवातीची लक्षण आहेत.

काविळ होण्याची कारणे

काही औषधं किंवा आजारांमुळे, दारूच्या अधिक सेवनाने, जेनेटिक मेटाबोलिज्म डिसऑर्डर, पित्ताशयात स्टोन किंवा सूज, पित्ताशयाचा कॅन्सर, अग्नाशयाचा कॅन्सर, डायबिटीस, लठ्ठपणा, नॉन-अल्कोहल फॅटी लिव्हर डिजीज इत्यादीमुळे काविळ होऊ शकतो.

बचावासाठी काय खावे?

प्रोटीन असलेले पदार्थ

प्रोटीन शरीराला ठीक होण्यास मदत करतं. कारण याने डॅमेज सेल्स रिपेअर होतात. काविळ झाल्यावर प्रोटीनचं सेवन वाढवल्यावर एंझाइमची निर्मिती चांगली होते. ज्यामुळे शरीरात हार्मोनच्या उत्पादनात मिळते.

फायबरचं सेवन वाढवा

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी फायबर फार महत्वाचं असतं. फायबर पित्त नलिकांमधून बाहेर काढण्यास मदत करतं. तसेच पोट साफ होण्यासही याने मदत मिळते. त्यासोबतच शरीरात कोलेस्ट्रॉल लेव्हलही कंट्रोल करतं.

व्हिटॅमिन्स

काविळच्या रूग्णांना लवकर बरे होण्यासाठी व्हिटॅमिन्स फार महत्वाचे असतात. व्हिटॅमिन बी शरीरातील फॅट तोडण्यास मदत करतं. व्हिटॅमिन ई, डी, ए आणि सी निरोगी होत असलेलं लिव्हर मजबूत बनवण्याचं काम करतात.

फळं

आंबट फळांमध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात जे शरीराला हायड्रेट ठेवतात. सोबत पाण्यातही हे भरपूर असतात. पीडित व्यक्तीने जांभळं, पपई, अॅवोकाडो, खरबूज आणि द्राक्ष ही फळं खावीत.

काय खाऊ नये?

काविळ जर झाला असेल तर तेलकट, मसालेदार, फास्ट फूड, तळलेले पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. सोबतच मांसही खाऊ नये. साधा घरगुती आहार घ्यावा ज्यातून तुम्हाला पोषक तत्व मिळतील. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य