शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कोरोनानंतर 'या' देशात नव्या  माहामारीचा कहर; १० राज्यातील लोक आजाराच्या विळख्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 16:49 IST

तब्बल १० राज्यांमध्ये या आजाराचा प्रसार वेगाने होताना दिसून येत आहे. यामुळे आता मोठ्या संख्येने पक्ष्यांना मारून दफन करण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोनाच्या माहामारीने संपूर्ण जगभरातील लोकांना गंभीर स्थितीचा सामना करावा लागत आहे. अजूनही अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या माहामारीत आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. जपानमध्ये बर्ड फ्लूने कहर केला आहे. तब्बल १० राज्यांमध्ये या आजाराचा प्रसार वेगाने होताना दिसून येत आहे. यामुळे आता मोठ्या संख्येने पक्ष्यांना मारून दफन करण्याचे आदेश दिले आहेत.

जपानच्या कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ११ हजार पक्ष्यांना मारून त्यांना दफन  केलं आहे. हा निर्णय दक्षिण पश्चिम जपानच्या शिगा प्रातांतील हिगाशीओमी शहरातील एका पोल्ट्री फॉर्ममध्ये अंड्यामुळे एवियन इन्फुंएंजा पसरल्यानंतर घेण्यात आला आहे. याव्यतिरिक्त कागवा प्रांतातही बर्ड फ्लू चा प्रकोप पाहायला मिळत आहे. या आजाराच्या प्रसाराची सुरूवात मागच्या महिन्यात झाली होती.  

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्यामते (एफएओ) जपान आणि शेजारी दक्षिण कोरियामध्ये पसरलेली माहामारी जगभरातील  कोंबड्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या दोन वेगवेगळ्या उच्च रोगजनक एवियन इन्फ्लूएंजा (एचपीएआई) यापैकी एक आहे. त्याचा जन्म सगळ्यात पहिल्यांदा युरोपमधील जंगली पक्ष्यांमध्ये झाला होता.

एफएओचे एक वरिष्ठ पशु आरोग्य अधिकारी मधूर ढींगरा यांनी सांगितले की, जपानमध्ये दिसून येणारा व्हायरस अनुवांशिंक रूपातून कोरियाई व्हायरस आणि युरोपमधील व्हायरसशी संबंधीत आहे. याचाच अर्थ असा की,  सध्याच्या काळात आशिया आणि युरोपमध्ये दोन वेगवेगळे एच 5 एन 8 एचपीएआय व्हायरस उपस्थित आहेत जे माहामारी पसरवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. 

सामान्यांना कोरोनाची लस कधी आणि कशी मिळणार? केंद्राने दिल्या लसीकरणाच्या नव्या गाईडलाईन्स

एफएओने अफ्रिकी आरोग्य अधिकाऱ्यांना नुकतंच फ्लू व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी  सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. जपानमधील ४७ प्रातांमध्ये १० पेक्षा जास्त राज्यांत या माहामारीने कहर केला आहे. जवळपास ३ लाख पक्षी या आजाराने प्रभावीत आहेत. कोरोनाची लस दिल्यानंतर दिसू शकतात हे ५ साईड इफेक्टस; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

टॅग्स :JapanजपानHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय