""लेक लाडकी या घरची""... हेलीकॉप्टरने आणले माहेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:31 AM2020-12-14T04:31:15+5:302020-12-14T04:31:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळाव : शहरातील नवविवाहित बहिणीला तिच्या भावांनी एक सुखद धक्का देत तिला माहेरी आणण्यासाठी चक्क हेलीकॉप्टरमधून ...

'' '' Lake Ladki's house '' '' ... Maheri brought by helicopter | ""लेक लाडकी या घरची""... हेलीकॉप्टरने आणले माहेरी

""लेक लाडकी या घरची""... हेलीकॉप्टरने आणले माहेरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळाव : शहरातील नवविवाहित बहिणीला तिच्या भावांनी एक सुखद धक्का देत तिला माहेरी आणण्यासाठी चक्क हेलीकॉप्टरमधून सफर घडवित माहेरी आणले. कावडीया परिवाराकडून लाडक्या बहिणीचे झालेले हे भन्नाट स्वागत शहरात चर्चेचा विषय झाले होते. सागर पार्कवर दुपारी हे हेलीकॉप्टर उतरल्यानंतर नागरिकांनीही हेलीकॉप्टरसह नवदाम्पत्याला पाहायला गर्दी केली होती.

कावडीया कुटुंबातील शिवानी अशोक कावडीया हिचा विवाह परळी वैजनाथ येथील प्रथितयश जैन परिवारातील डॉ. कुणाल यांच्यासोबत झाला. शिवानी लग्नानंतर प्रथमच माहेरी येणार होती. यासाठी भाऊ विराज याने हटके स्वागत करायचे ठरवून परळी येथे थेट हेलिकॉप्टर घेऊन जात बहिणीला आश्चर्याचा धक्का दिला. हे हेलीकॉप्टर विमानतळावर उतरण्याचे नियोजन होते. मात्र, विमानतळावर धावपट्टीवर कारपेंटिंगचे काम सुरू असल्याने प्रशासनाकडून नकार देण्यात आला. यावर मार्ग काढत सर्व शासकीय परवानगी घेऊन हेलिकॉप्टर सागर पार्कवर हेलीपॅड तयार करून उतरविण्यात आले. दरम्यान, शिवानीच्या स्वागतासाठी अमित जगताप, समीर कावडीया, विपीन कावडीया, पियुष हसवाल, संदीप सूर्यवंशी, प्रीतम शिंदे, प्रतीक कावडीया, आयुष्य कस्तुरे, तृष्णात तिवारी, पंकज सुराणा, पवन चव्हाण, प्रशांत वाणी आदी उपस्थित होते.

Web Title: '' '' Lake Ladki's house '' '' ... Maheri brought by helicopter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.