जळगावात उष्णतेची लाट सर्वोच्च ४७ अंश तापमानाची नोंद : उन्हाचे अक्षरश: चटके, दुपारी रस्ते निर्मनुष्य
By admin | Updated: May 19, 2016 00:42 IST
जळगाव : गेल्या आठवड्यापासून वाढत जाणार्या उन्हामुळे सुवर्णनगरी होरपळून निघाली आहे. बुधवारी या मोसमातील सर्वोच्च ४७ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. शनिवारपासून ४६ अंशावर गेलेला पारा कमी होत नसल्याचे चित्र आहे. या उष्णतेच्या लाटीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून दुपारी रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र शहरात होते.
जळगावात उष्णतेची लाट सर्वोच्च ४७ अंश तापमानाची नोंद : उन्हाचे अक्षरश: चटके, दुपारी रस्ते निर्मनुष्य
जळगाव : गेल्या आठवड्यापासून वाढत जाणार्या उन्हामुळे सुवर्णनगरी होरपळून निघाली आहे. बुधवारी या मोसमातील सर्वोच्च ४७ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. शनिवारपासून ४६ अंशावर गेलेला पारा कमी होत नसल्याचे चित्र आहे. या उष्णतेच्या लाटीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून दुपारी रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र शहरात होते. बुधवारी सकाळपासूनच सूर्य आग ओकत होता. दुपार होताच शरीराला अस चटके बसत होते. त्यामुळे दुपारी शहरातील बहुसंख्य रस्ते निर्मनुष्य झाले होते. कामानिमित्त बाहेर निघणार्यांनी डोक्यात टोपी, तोंडावर रुमाल व डोळ्यावर चष्मा घातला होता. तळहातावर पोट असलेल्यांना रखरखत्या उन्हात आपला व्यवसाय करावा लागला. या वाढत्या तापमानामुळे घरातील कुलर आणि फॅनदेखील निरुपयोगी ठरत आहे. सिमेंट, लोखंडी पत्र्यांच्या घरात सर्वाधिक उकाडा जाणवत आहे.रात्रीपर्यंत उष्णलहरतापमान ४७ अंश सेल्सीअसपर्यंत पोहचल्यामुळे सूर्यास्त झाल्यानंतरदेखील बुधवारी रात्रीपर्यंत उष्णतेच्या झळा बसत असल्याने नागरिक हैराण होत होते. उष्णतेचा सर्वाधिक फटका हा लहान मुले आणि वृद्धाना बसत होता. जास्त उष्णतेमुळे डोळ्यांची जळजळ होणे, डोके दुखणे, मळमळ होणे असा त्रास होत होता.वाढत्या तापमानाचा मनुष्याला फटका बसत असताना पशुपक्षी व प्राण्यांनादेखील तडाखा बसत होता. मोकाट गायी व गुरे सावलीच्या शोधासाठी झाडाखाली बसून होते. ११ वाजेपासून रस्ते निमर्नुष्यसकाळी ९ वाजेपासून उन्हाचा तडाखा जाणवत होता. सकाळी ११ वाजेपासून रस्त्यांवर वाहने नसल्याने रस्ते निर्मनुष्य झाले होते. दुपारी १२ वाजेनंतर तापमानात वाढ झाली. क्वचितच कामानिमित्त कोणी वाहनाने रस्त्यावरून जाताना दिसल्यानंतर तो काही अंतरावर गेल्यावर सावली व पाण्याचा शोध घेत होता.सकाळीच कामांची धडपडसकाळी ११ वाजेनंतर उन्हाचा तडाखा वाढत असल्याने नागरिक सकाळीच कामे आटोपण्यावर भर देत आहेत. दुपारी शहरातील रस्त्यांवर अघोषित संचारबंदी असल्यासारखी स्थिती असते.वाढते तापमान१४ मे- ४५१५ मे- ४६१६ मे- ४४.७१७ मे- ४६१८ मे- ४७ (ताममान अंश सेल्सीअस)पुढील चार दिवस आणखी उष्णलहर राहू शकते. त्यामुळे शक्यतो दुपारी घराबाहेर निघू नये. सकाळीच कामे पूर्ण करावी, असा सल्ला दिला जात आहे. -१९ मे- ४६-२० मे- ४३.३-२१ मे- ४२.२८-२२ मे- ४२.२८ (ताममान अंश सेल्सीअस)