शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रोज रात्री एक ग्लास दूध व गुळ खाण्याचे हे आहेत 5 मुख्य फायदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 20:59 IST

अधिक प्रमाणात गोड पदार्थाचं सेवन केल्यास केवळ शारीरिक वजन वाढण्याचाच धोका नसतो तर अनेक आजारांनाही यामुळे निमंत्रण मिळू शकते.

मुंबई - अधिक प्रमाणात गोड पदार्थाचं सेवन केल्यास केवळ शारीरिक वजन वाढण्याचाच धोका नसतो तर अनेक आजारांनाही यामुळे निमंत्रण मिळतं. यामुळेच डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ गोड पदार्थ खाणं टाळण्यास सांगतात. मात्र, गुळ एक असा गोड पदार्थ आहे जो तुमच्या आरोग्यासाठी प्रचंड पोषक आहे.  रोज रात्री दुधासोबत गुळाच्या एका छोट्या तुकड्याचं सेवन केल्यास अनेक आजारांपासून सुटका होण्यास मदत होते. गुळ व दुधातील सत्त्व शरीरास निरोगी राहण्यास मदत करतात. गुळामधील लोह आणि दुधातील कॅल्शिअममुळे स्नायू आणि सांध्यांचं दुखणे कमी होण्यास मदत होते.  दुधामध्ये व्हिटॅमिन 'अ', 'ब' व 'ड' व्यतिरिक्त कॅल्शिअम, प्रथिने आणि लॅक्टिक अॅसिडदेखील असते. तर गुळामध्ये सुक्रोज, ग्लुकोज आणि खनिजं मोठ्या प्रमाणात असते. 

रोज एक ग्लास दूध आणि गुळ खाण्याचे हे आहेत पाच फायदे  

1. पचन प्रक्रिया सुधारण्यास होते मदतगुळामध्ये पचन प्रक्रियेसंदर्भातील आजार सुधारण्यास मदत होते. गुळामुळे पचन प्रक्रिया सुलभरित्या होते व पोटामध्ये गॅस निर्माण होत नाहीत. विशेषकरुन हिवाळ्याच्या दिवसांत होणा-या पोटाच्या समस्या गुळ व दुधानं कमी होतात. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दुधासोबत एक तुकडा गुळाचे सेवन नक्की करा. 

2. दम्यापासून मिळते सुटकाथंडीमध्ये दम्याच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. ऑक्सिजनची कमतरता आणि वाढत्या प्रदुषणामुळे श्वास घेण्यास दम्याच्या रुग्णांना त्रास होतो. अशावेळी त्यांच्या शरीरात उष्णता कायम राहावी  व कफ बाहेर पडण्यास मदत व्हावी यासाठी रोज दूध व गुळाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. गुळ व काळ्या तिळांचा लाडू बनवून तो दुधासोबतही तुम्ही खाऊ शकता.

3. सांध्यांचे दुखणे होते कमीदूध व गुळाच्या सेवनामुळे सांध्यांचे दुखणेदेखील कमी होण्यास मदत होते. कारण दुधात व्हिटॅमिन डी व कॅल्शिअम आणि गुळातील लोहामुळे सांधे मजबूत होतात. तुम्ही गुळाचा तुकडा आल्यासोबतही खाऊ शकता. यामुळे देखील शरीरास आरोग्यास फायदा मिळेल.  

4. रक्तशुद्धीकरण गुळ शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम करते.  शिवाय, हिमोग्लोबीनचेही प्रमाण वाढण्यास मदत होते आणि रोग प्रतिकारकशक्तीदेखील वाढते. यामुळे मासिक पाळीच्या वेळेस दुधासोबत गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

5.  वजन घटवण्यास होते मदत  गुळ मधाप्रमाणेच आरोग्यास फायदेशीर असा आहे. कारण गुळ रासायनिक प्रक्रियांविना तयार केला जातो. यामुळे गुळ साखरेहून अधिक शरीरास पोषक आहे. यामुळेच रोज रात्री झोपण्यापूर्वी दुधासोबत गुळाचे सेवन करावे. 

आणखी वाचा: तांब्याची भांडी वापरणं आरोग्यासाठी उत्तम

टॅग्स :Healthआरोग्य