शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

उन्हाळ्यात खा 'या' फळाची भाजी, पचनसंस्था राहिल सुरळीत...इतरही भरपूर फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 17:32 IST

पिकलेला फणस खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. फणस ही पोषक तत्वांनी समृद्ध हंगामी भाजी आहे, जी खाल्ल्याने शरीर अनेक आजारांपासून (Ripe Jackfruit In Summer) दूर राहते.

उन्हाळ्यात फणस भरपूर प्रमाणात बाजारात येत असतात. फणसाचे गर खाण्यासोबतच त्याची भाजी आणि इतर पदार्थही बनवले जातात. वाढत्या उष्णतेमध्ये पिकलेला फणस खाणे आरोग्यासाठी तितकेच फायदेशीर असते. पिकलेला फणस खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. फणस ही पोषक तत्वांनी समृद्ध हंगामी भाजी आहे, जी खाल्ल्याने शरीर अनेक आजारांपासून (Ripe Jackfruit In Summer) दूर राहते.

वास्तविक, पिकलेल्या फणसात प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असते. व्हिटॅमिन ए, सी, थायामिन, पोटॅशियम, कॅल्शियम, रिबोफ्लेविन, लोह, नियासिन आणि जस्त मुबलक प्रमाणात आढळतात, अशी माहिती EverydeHealth मध्ये दिली आहे. एवढेच नाही तर पिकलेल्या फणसात फायबरचे गुणधर्मही आढळतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पिकलेल्या फणसात आढळणारे पोटॅशियम हृदयाशी संबंधित आजार दूर ठेवण्यास मदत करते आणि यकृत देखील निरोगी ठेवते. उन्हाळ्यात पिकलेले फणस का खावे ते जाणून घेऊया.

फणस खाण्याचे फायदेपचन सुधारते -उन्हाळ्यात ज्यांना पचन नीट होत नाही, अशा लोकांनी पिकलेला फणस नक्की खा. फणस अल्सर आणि पचनाच्या समस्या कमी करतो. यामुळे वजन कमी करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास देखील मदत होते.

प्रतिकारशक्ती वाढतेपिकलेल्या फणसात व्हिटॅमिन सी आढळते. व्हिटॅमिन-सी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते, जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते. पिकलेला फणस खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फणस फायदेशीर आहे.

हृदय निरोगी ठेवते -पिकलेले फणस खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. पिकलेल्या फणसात असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

वजन नियंत्रण -फणस हा रेझवेराट्रोल नावाच्या अँटीऑक्सिडंटचा चांगला स्रोत आहे. पिकलेल्या फणसात असलेले दाहक-विरोधी गुणधर्म लठ्ठपणा टाळण्यास मदत करतात. फणसाच्या सेवनाने वाढलेले वजन कमी करता येते.

यकृत निरोगी -पिकलेला फणस खाल्ल्याने यकृत निरोगी राहते. पिकलेल्या फणसात असलेले पोषक तत्व यकृताला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात.

फणसच नाही तर पानेही गुणकारी -ज्यांना तोंडात वारंवार फोड येत असतात त्यांनी फणसाची पाने चावून थुंकावी. यामुळे अल्सरच्या समस्येत आराम मिळतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स