शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

Health tips: गोड खाल्ल्याने वजन वाढते? डायबिटीस होतो? पण, 'हे' गोड फळ तर या दोन्ही त्रासांवर रामबाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 17:38 IST

उन्हाळ्यात फणस आवर्जून खाल्ला जातो. फणस आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतो. फणसाला शाकाहारी लोकांचं नॉनव्हेजही म्हटलं जातं.

पोषणासाठी शाकाहारी लोकांना फारसे पर्याय नाहीत असं म्हटलं जातं. पण काही पदार्थ मात्र असे आहेत जे खाल्ल्यामुळे शाकाहारी लोकांनाही भरपूर पोषण मिळतं. भरपूर पोषणमूल्य असलेल्या भाजी-फळांमध्ये फणसाचाही (Jackfruit) समावेश होतो. देशभरात फणसाच्या विविध प्रकारच्या पाककृती केल्या जातात. विशेषत: उन्हाळ्यात फणस आवर्जून खाल्ला जातो. फणस आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतो. फणसाला शाकाहारी लोकांचं नॉनव्हेजही म्हटलं जातं.याचबद्दल आज तक वर अधिक माहिती देण्यात आली आहे.

प्रतिकार शक्ती वाढवणंऋतु बदलला की आजारांचं प्रमाण वाढतं. अशा हंगामी इन्फेक्शन आणि आजारांपासून दूर राहण्यास फणसाचं सेवन अत्यंत गुणकारी आहे असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. फणसात व्हिटॅमिन ए, सी, बी यांच्यासह डाएट फायबर, पोटॅशियम,आयर्न, मॅग्नेशियम, झिंक आणि फॉस्फरस हे घटक असतात. त्यामुळे आजाराशी लढणाऱ्या प्रतिकारशक्ती (Immunity building) वाढवण्यात फणस अत्यंत उपयुक्त ठरतो.

वजन कमी करणंफणसात कॅलरीजचं प्रमाण कमी असतं पण फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे आपली पचनशक्ती सुरळीत ठेवण्यात मदत होते. त्याशिवाय फणसामुळे चयापचय क्रियेचा वेगही वाढतो. याचा उपयोग वजन नियंत्रणात ठेवण्यात (Weight Loss Management) होतो.

हाडं मजबूत करणंफणस कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे असं आरोग्यतज्ज्ञ मानतात. कॅल्शियम आपल्या हाडांच्या मजबुतीसाठी अत्यंत आवश्यक असतं. त्याशिवाय त्यात व्हिटॅमिन-सी आणि मॅग्नेशियम असतं. हे घटक हाडं मजबूत (Strong Bones) करण्यात उपयुक्त असलेल्या कॅल्शियमला शोषून घेण्यात मदत करतात.

झोपेसाठी गुणकारीझोपेबद्दलच्या इन्सोमेनियासारख्या तक्रारींवरही फणस अत्यंत गुणकारी आहे हे अनेकांना माहिती नाही. फणस जर डाएटमध्ये नियमितपणे खाल्ला जात असेल तर शरीरातील न्युरोट्रान्समीटर लेव्हल नियंत्रणात ठेवली जाते. त्यामुळे आपल्या नसांना आराम मिळतो आणि झोपही चांगली लागते. त्यामुळे झोपेची (To regulate Sleep cycle) तक्रार असणाऱ्यांनी फणसाचा आपल्या रोजच्या जेवणात समावेश अवश्य करावा.

डायबेटिस नियंत्रणडायबेटिस म्हणजेच मधुमेह नियंत्रणात (Diabetes Control) ठेवण्यामध्ये फणस अत्यंत उपयुक्त ठरतो. फणस खाल्यानं रक्तातील साखर नियंत्रणात राहते. फणसात फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरातील ग्लुकोज आणि इन्शुलिन रिलीज करण्याचा वेग कमी होतो आणि भुकेवर नियंत्रण ठेवण्यात मदत होते. परिणामी डायबेटिसच्या रुग्णांची शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

फणस उपयुक्त आहे हे आपण ऐकलेलं असतं पण इतका उपयुक्त आहे हे माहीत नसतं. त्यामुळे त्याचे आणखीही गुणधर्म जाणून घेऊन त्याचं सेवन वाढवलंत तर तुम्हालाही नक्कीच फायदा होईल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स