शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Diabetes tips: 'हे' फळं म्हणजे डायबिटीस रुग्णांसाठी वरदान, याच्या सेवनाने डायबिटीस कमालीचा कमी होतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 16:38 IST

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही एका फळाचा उपयोग करु शकता. या फळाचा प्रत्येक भाग मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहे.

मधुमेह नियंत्रित करणे खूप कठीण आहे. आपल्या आहारात थोडासा अडथळा आला की रक्तातील साखर वाढू लागते. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय अवलंबले पाहिजेत. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही एका फळाचा उपयोग करु शकता. या फळाचा प्रत्येक भाग मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहे.

हे फळ म्हणजे जांभूळ. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही जांभळाचे सेवन करू शकता. जांभूळ, त्याच्या बिया, पाने आणि साल अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही जांभूळ खूप फायदेशीर आहे. जांभूळ खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते, अनेक आजार दूर राहतात. हिवाळ्यात तुम्ही जांभळाच्या बियांचा वापर करू शकता. मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभळाच्या बिया अतिशय उपयुक्त आहेत. जांभळाच्या बियांची पावडर बनवून रोज खाल्ल्यास मधुमेहाशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. जांभळाच्या बियांचे फायदे आणि ते कसे वापरावे ते जाणून घ्या.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते जांभळाच्या बियांमध्ये जॅम्बोलिन आणि जॅम्बोसिन आढळतात. त्यामुळे रक्तातील साखरेचे उत्सर्जन मंद होते आणि इन्सुलिनची पातळीही वाढते. जांभळाच्या बिया वाळवून पावडर बनवा. जेवण करण्यापूर्वी ही पावडर खा.

  • रोज जांभूळ खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर राहतील.
  • जांभळाच्या सालाचा उष्मा प्यायल्याने पोटदुखी, अपचन यांसारख्या समस्या होत नाहीत.
  • जांभूळ खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
  • जांभळाच्या सेवनाने शरीरातील रक्ताची पातळी वाढते आणि रक्ताची कमतरता पूर्ण होते.
  • स्टोनची समस्या असल्यास जांभळाच्या बियांचे चूर्ण बनवून दह्यात मिसळून घेतल्याने आराम मिळतो.

जांभळाच्या बियांची अशी पावडर बनवाप्रथम जांभूळ धुवून बिया लगद्यापासून वेगळे करा. आता पुन्हा एकदा बिया धुवून कोरड्या कपड्यावर ठेवा आणि ३-४ दिवस उन्हात वाळवा. पूर्ण सुकल्यानंतर वजन हलके वाटू लागले की वरील पातळ साल काढून मिक्सरमध्ये बिया चांगल्या वाटून घ्या. पूर्ण फायदे मिळविण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी दुधासह घ्या. ही पावडर रोज खाल्ल्यास मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. याशिवाय पोटाशी संबंधित कोणतीही समस्या होणार नाही.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह