शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

आयव्ही थेरपी... नशेनंतरची नवी उपचार पद्धती; बदलत्या काळाची गरज की फॅशन? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 07:49 IST

हँगओव्हरवर लिंबूपाण्याचे सेवन, ॲस्पिरिन घेणे किंवा निद्राधीन होणे हे उपाय आहेत. परंतु...

डॉ. अविनाश सुपे, माजी अधिष्ठाता, केईएम रुग्णालय -

मुंबई : पार्ट्या, लग्नसमारंभ, कॉर्पोरेट मेजवान्या यांमध्ये मद्यपान हे सामान्य झाले आहे. मात्र, मद्यपानानंतर होणारी अवस्था टाळण्यासाठी नवनवीन उपाय शोधले जात आहेत. त्यातलीच एक बहुचर्चित पद्धत म्हणजे आयव्ही थेरपी. 

हँगओव्हरवर लिंबूपाण्याचे सेवन, ॲस्पिरिन घेणे किंवा निद्राधीन होणे हे उपाय आहेत. परंतु, आता महानगरांमध्ये हँगओव्हर क्लिनिक उदयाला येऊ लागले आहेत. हँगओव्हर झाला असेल, तर थेट या क्लिनिकमध्ये यायचे. तिथे तुम्हाला सलाइनद्वारे रक्तात पोषक द्रव्ये सोडली जातात. मुंबई, दिल्ली, बंगळुरू व हैदराबाद येथे ही क्लिनिक  आहेत. 

नव्या पिढीचा कल २५ ते ४० वयोगटातील तरुण व्यावसायिक या सेवांकडे अधिक वळत आहेत. आमच्या पिढीला वेळेचे जास्त महत्त्व आहे. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायचे असते, महत्त्वाची मीटिंग असते. त्यामुळे लवकर रिकव्हर होणे गरजेचे असते, असे हे व्यावसायिक सांगतात. 

सेवा आणि किंमतया क्लिनिकमध्ये विविध ‘पॅकेजेस’ उपलब्ध असतात. बेसिक ड्रिपपासून ते अत्याधुनिक व्हिटॅमिन थेरपीपर्यंत यात पर्याय आहेत. या थेरपींचे शुल्क सहा हजार ते ४५ हजार रुपयांपर्यंत असते. प्रत्येक ड्रिपमध्ये इलेक्ट्रोलाइट्स, व्हिटामिन्स, मॅग्नेशियम, झिंक आणि विविध औषधांचे मिश्रण असते.'

वैद्यकीय दृष्टिकोनअनेक डॉक्टर या ट्रेंडबद्दल साशंक आहेत. ही फक्त श्रीमंतांसाठी असलेली फॅशन आहे. निरोगी व्यक्तीला याची गरज नाही, असेही काही तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. या पद्धतीमुळे हृदयविकार व मूत्रपिंड समस्या असलेल्यांवर दुष्परिणाम होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

नशा व सामाजिक बदलनशेनंतरची नवी उपचार पद्धती हा ट्रेंड केवळ वैद्यकीय नाही, तर सामाजिक बदलाचेही निदर्शक आहे. आधुनिक जीवनशैलीत ताण  तणाव वाढले त्या सोबत मद्यपान ही वाढले आहे. कॉर्पोरेट कल्चर, सोशल नेटवर्किंग, स्ट्रेस मॅनेजमेंट या सर्वांचा यात समावेश आहे.वैद्यकीय व शास्त्रीय भूमिका- हे क्लिनिक्स कोणत्या नियमांखाली चालतात? त्यांच्यावर देखरेख कोण करतो? या मागील वैद्यकीय व शास्त्रीय भूमिका काय, असे प्रश्न विचारले जात आहेत. - अशा प्रकारच्या नवीन उपचार पद्धतीचा खरच किती उपयोग होतो, हा अजून तरी चर्चेचा विषय आहे. थोडक्यात, नवीन तंत्रज्ञान आणि वैद्यकीय प्रगती स्वागतार्ह आहे. पण त्याचा वापर विवेकाने करणे महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर