शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इटस अ लीकी इश्यू..! भारतात १२ टक्के पीडित महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 21:08 IST

जगभरातील ४५ वर्षांवरील २०.८ टक्के महिलांमध्ये हा आजार आढळून येतो. महिला ब-याचदा हा आजार अंगावर काढतात; कारण त्यांना याबाबत चर्चा करण्याची लाज वाटते.

ठळक मुद्देअनैैच्छिक लघवी होण्याची समस्या, एसयूआय हा आजार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक या आजाराच्या तणावामुळे सामाजिक जीवन व राहणीमानाच्या दर्जावर देखील परिणाम

पुणे : महिला आजही स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना आणि काही आजारांबाबत मौैन पाळताना दिसतात. काम किंवा व्यायाम करताना, शिंकताना अथवा खोकताना अनैच्छिकपणे लघवी होण्याची समस्या महिलांना उद्भवते. स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनन्स या आजाराबाबत आजही महिला जागृत नसल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. भारतात १२ टक्के महिला या आजाराने पीडित असल्याचा अंदाज वैैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवला आहे.जगभरातील ४५ वर्षांवरील २०.८ टक्के महिलांमध्ये हा आजार आढळून येतो. महिला ब-याचदा हा आजार अंगावर काढतात; कारण त्यांना याबाबत चर्चा करण्याची लाज वाटते. हा आजार वैद्यकीय उपचारांसह बरा होऊ शकतो. याबाबत त्यांच्यामध्ये पुरेशी जागरूकता देखील दिसून येत नाही, असे निरिक्षण पुण्यातील इंटरनॅशनल सोसायटी फॉर गायनॅकोलॉजी एन्डोस्कोपीने नोंदवले आहे.डॉ. सुनिता तांदुळवाडकर म्हणाल्या, एसयूआय हा आजार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक दिसून येतो. सामाजिक जीवनातील जीवनशैलीमधून अनेक व्यक्तींना एसयूआय आजार होतो. रुग्ण हा आजार कुटुंब, मित्र व डॉक्टरांपासून लपवण्याचा प्रयत्न करतात. या आजाराबाबत लाज वाटणे, गैरसमज आणि दुर्लक्ष अशा गोष्टींमुळे महिला उपचार घेणे टाळतात. उपचार घेण्यामध्ये विलंब केल्याने हा आजार अधिक गंभीर होऊ शकतो. या आजाराच्या तणावामुळे सामाजिक जीवन व राहणीमानाच्या दर्जावर देखील परिणाम होऊ शकतो.---------वय हे या आजारामागचे एक कारण आहे. वाढत्या वयासह शरीरात होणारे बदल देखील एसयूआय होण्यास कारणीभूत ठरू शकतात. प्रसूतीनंतरही एसयूआयचा त्रास होऊ शकतो. कारण प्रसूतीदरम्यान ऊती किंवा मज्जातंतूंना इजा होऊ शकते. या इजांमुळे एसयूआय आजार प्रसूतीनंतर लगेच किंवा काही वषार्नंतर होऊ शकतो.- डॉ. रिश्मा पै, अध्यक्षा, इंडियन असोसिएशन आॅफ गायनॅकोलॉजिकल एन्डोस्कोपीस्ट्स ------------------एसआययू म्हणजे काय?- मूत्राशयाला मदत करणारे स्नायू व इतर ऊती, लघवी बाहेर पडण्यामध्ये मदत करणारे स्नायू कमकुवत झाल्याने एसयूआय आजार होतो. - लठ्ठ आणि हिस्टेरक्टॉमी झालेल्या महिलांना देखील हा आजार होऊ शकतो. पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाच्या उपचारादरम्यान प्रोस्टेट ग्रंथी काढून टाकण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे एसयूआय होऊ शकतो.- वैयक्तिक स्वच्छता हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे. या आजारामुळे त्वचा संसर्ग व मूत्रपिंडविषयक आजार होऊ शकतात. - या आजारावर अत्यंत कमी इन्वेसिव्ह प्रक्रियांसह सुलभपणे व परिणामकारक उपचार करता येऊ शकतो.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिला