शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

आवळा आहे गुणकारी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 17:33 IST

थंडीत बाजारात सर्वत्र आवळा विकायला येतो. चवीला तुरट आणि आंबट असणारे हे फळ ‘व्हिटॅमिन सी’ ने संपन्न आहे. आवळयाची फळे, फुले, पान, बिया, झाडाची साल, मुळे सर्व काही उपयुक्त आहे. आयुर्वेदात आयुष्य आणि ताकद वाढवणारा आवळा म्हणून खूपच उपयुक्त आहे. चवनप्राश, त्रिफळा चूर्ण ही आवळ्याची लोकप्रिय औषधे. शाम्पूसारख्या सौंदर्य प्रसाधनांमध्येही आवळ्याचा उपयोग केला जातो.

थंडीत बाजारात सर्वत्र आवळा विकायला येतो. चवीला तुरट आणि आंबट असणारे हे फळ ‘व्हिटॅमिन सी’ ने संपन्न आहे. आवळयाची फळे, फुले, पान, बिया, झाडाची साल, मुळे सर्व काही उपयुक्त आहे. आयुर्वेदात आयुष्य आणि ताकद वाढवणारा आवळा म्हणून खूपच उपयुक्त आहे. चवनप्राश, त्रिफळा चूर्ण ही आवळ्याची लोकप्रिय औषधे. शाम्पूसारख्या सौंदर्य प्रसाधनांमध्येही आवळ्याचा उपयोग केला जातो. आयुर्वेदशास्त्राने आवळा हे फळ तारुण्यरक्षक व सर्वाधिक आरोग्यदायक मानले आहे. आधुनिक आहारशास्त्राच्या मतेदेखील आवळ्यात सर्वांत जास्त ‘क’ हे जीवनसत्त्व असल्यामुळे त्यातील वृद्धत्व रोखण्याचे गुणधर्म अधोरेखित केले आहेत. आवळ्याचे आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे कापणे, वाळवणे, शिजवणे अशी कोणतीही प्रक्रिया आवळ्यावर केली तरी यातील ‘क’ जीवनसत्त्व अबाधित राहते. अन्य फळांमधील ‘क’ जीवनसत्त्व वरील कृतींनी नष्ट होऊ शकते. ज्यांना रोज ताजा आवळा खाणे शक्य नाही अशांसाठी आवळा रस, मोरावळा, च्यवनप्राश, आवळा कँडी, आवळ्याचा वाळवलेला कीस, आवळा पावडर (आमलकी चूर्ण) हे काही पर्याय आहेत. आवळ्याचे अन्य गुणधर्म १. लाइफस्टाइल डिसीजेसवर गुणकारी - विपुल ‘क’ जीवनसत्त्व, पोटॅशियम, बेटकेरोटिन, क्रोमियम व भरपूर तंतू या सर्वांमुळे आवळा हा टाइप टू डायबेटीस, हाय कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, गाऊट, स्थौल्य अशा सर्व लाइफस्टाइल आजारांमध्ये गुणकारी आहे. २. ‘क’ जीवनसत्त्वाचा सर्वांत उत्तम स्रोत - आपल्या रोजच्या गरजेएवढे ‘क’ जीवनसत्त्व केवळ अर्धा आवळा खाल्ल्याने मिळू शकते. अन्य फळांमधून तेवढेच ‘क’ जीवनसत्त्व मिळण्यासाठी एक मोसंबी किंवा एक संत्रे किंवा ३-४ सफरचंदे किंवा ५ केळी खावी लागतील. ३. उत्तम पित्तशामक - पित्त प्रकृती असणाऱ्याना पित्तामुळे डोळ्याची आग होणे, छातीत जळजळ होणे, डोकेदुखी, उलटी अशा तक्रारींसाठी आवळा गुणकारी ठरतो. ४. मधुमेहींना फायदा - क्रोमियम, ‘क’ जीवनसत्त्व व इन्सुलिनला उद्युक्त करण्याचा गुण या तीन गोष्टींमुळे आवळा हा मधुमेहींसाठी औषधासमान आहे. ५. क्षुधावर्धक - आवळा चूर्ण व मध किंवा लोणी हे क्षुधावर्धक असून, भूक मंदावली असल्यास याचा उपयोग करावा