शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिममध्ये वर्कआऊट करणाऱ्यांना प्रोटीन पावडरची गरज असते का? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 16:45 IST

तुम्ही जर जिममध्ये प्रोटीन पावडरही घेत असाल किंवा त्याबाबत प्लॅनिंग करत असाल तर त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले तर तुम्ही स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवू (Protein Powder Effect on Health) शकता.

काही लोकांना बॉडी बिल्डिंग (Body Building) करण्याची आवड असते आणि त्यासाठी ते प्रोटीन पावडरसह अनेक सप्लिमेंट्स वापरतात. तज्ज्ञांच्या मते, प्रोटीन पावडरचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. या बाबतीत निष्काळजीपणा करणं आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतं. तुम्ही जर जिममध्ये प्रोटीन पावडरही घेत असाल किंवा त्याबाबत प्लॅनिंग करत असाल तर त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले तर तुम्ही स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवू (Protein Powder Effect on Health) शकता.

फिटनेस तज्ज्ञ काय म्हणतात?आरोग्य आणि फिटनेस प्रशिक्षक अरुण सिंह News 18 हिंदीला दिलेल्या माहितीत म्हणतात की, सर्व लोकांना नैसर्गिक पद्धतीने प्रोटीनची मात्रा पूर्ण करण्याचा सल्ला व्यायामशाळेत दिला जातो. स्नायूंचं वस्तुमान राखण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीला प्रति किलोग्रॅम वजनासाठी 1 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. जे लोक त्यांच्या आहारात अंडी, मांस, चीज, मासे, चिकन, दूध, दही आणि फळांचा समावेश करतात, त्यांना गरजेनुसार प्रोटीन मिळतं. ज्या लोकांना नैसर्गिकरित्या प्रथिने मिळू शकत नाहीत, त्यांना कधीकधी प्रोटीन पावडर वापरण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, प्रोटीन पावडर अत्यंत सावधगिरीने खरेदी करावी. बाजारात उपलब्ध असलेली सर्वच उत्पादनं आरोग्यासाठी चांगली असू शकत नाहीत.

अशा लोकांनी प्रोटीन पावडर घेऊ नये -अरुण सिंह म्हणतात की, ज्या लोकांना यकृताच्या समस्या आहेत त्यांना प्रोटीन पावडर घेण्याचा सल्ला दिला जात नाही. याशिवाय किडनी आणि इतर अंतर्गत आजार असलेल्या रुग्णांना कोणत्याही प्रकारचे सप्लिमेंट घेण्यास मनाई आहे. फिटनेस प्रशिक्षक म्हणतात की, डॉक्टर कधीही प्रोटीन पावडरचा सल्ला देत नाहीत. जर तुम्हाला प्रोटीन घ्यायचे असेल तर तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करू शकता. अशा लोकांनी योग्य प्रशिक्षकाच्या सूचनेनुसार जिम करावी.

चांगला आहार घेणं खूप महत्त्वाचं -फिटनेस कोचच्या मते, सर्व लोकांनी जिम करताना हेल्दी डाएट (Healthy Diet) घेतला पाहिजे. त्यासोबतच योग्य व्यायाम केला तर कोणतंही सप्लिमेंट घेण्याची गरज भासणार नाही. तसंच, बाजारात मिळणारे कोणतेही सप्लिमेंट्स योग्य प्रमाणात घेणं आवश्यक असतं. अन्यथा, प्राणघातक परिणामांनाही सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे बॉडी बिल्डिंग अत्यंत सावधगिरीने करायला हवी.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स