शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत चार मजली इमारत कोसळली, ४ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले
2
मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून...; मंत्र्यांचा दावा खोडत धनंजय मुंडेंनी प्रकृतीबाबत केला खुलासा
3
अमेरिकेत भारतीय विद्यार्थी सरकारच्या टार्गेटवर, व्हिसा रद्द झालेल्या जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये ५० टक्के भारतीय
4
World Press Photo of the Year: आई, आता मी तुला मिठी कशी मारू?
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२५: आजचा दिवस आनंदात जाईल, प्रत्येक कामात यश मिळेल
6
भारताला जपानकडून मिळणार २ मोफत बुलेट ट्रेन; अवघ्या १ तासात ३२० किमी अंतर गाठणार!
7
अग्रलेख: वक्फ कायद्याला झटका, ...तर नव्या कायद्याचा उद्देशच नष्ट होईल
8
राज्यातील कृषी विभागातील बहुतेक बदल्या आता मंत्रीमुक्त, आता बदल्यांचे अधिकार कोणाला?
9
टॅरिफ युद्धात सोन्याचा निर्विवाद विजय! मौल्यवान धातूचा भाव एक लाखाच्या उंबरठ्यावर, सोन्याची आयात तब्बल १९२ टक्क्यांनी वाढली
10
ठाणे: 'पार्टीत चूक झाल्यास अप्पा मुलांना द्यायचा विजेचा शॉक'; खडवली बालआश्रमातून सुटका केलेल्या मुलांनी सांगितली आपबीती
11
सोयाबीन खरेदीचा ‘एमपी पॅटर्न’, २४ तासांत हातात पैसे; अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन
12
‘भगवद्गीता’ची हस्तलिखितांचा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश
13
टॅरिफने अर्थव्यवस्था कमकुवत, महागाई वाढेल, पण मंदी नाही : जॉर्जीव्हा
14
विशेष लेख: डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारयुद्धाचे भारताला किती चटके?
15
नाशिक दर्ग्याचे पाडकाम प्रकरण : महापालिकेच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
16
छत्रपती संभाजीनगर: एम.फिल. धारक प्राध्यापक रडारवर, पात्रता कागदपत्रांची होणार तपासणी
17
छत्रपती संभाजीनगरात डिफेन्स पार्कसाठी  संरक्षणमंत्री अनुकूल, दिल्लीत बैठक घेणार
18
मुंबई: स्वस्त सोन्याच्या मोहाने घात केला; सराफा व्यापाऱ्याला विकली २.३० कोटींची नकली नाणी
19
"छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते"; आमचे आदर्श मुस्लिमविरोधी नसल्याचे राजनाथ सिंहांचे विधान
20
Tim David नं मोडला किंग कोहलीचा विक्रम; अर्धशतकी खेळीसह असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

रोज एक्सरसाईज करणं गरजेचं आहे का? आठवड्यातून किती तास पुरेसे ठरतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:38 IST

Fitness tips : तसं पहायला गेलं तर एक्सरसाईज करण्यामागचा उद्देश शरीर अ‍ॅक्टिव ठेवणं आहे. यासाठी सतत जिममध्ये जाऊन एक्सरसाईज करण्याची गरज नाही.

Fitness tips : लोक आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी रोज एक्सरसाईज करण्याकडे भर देतात. इतकंच नाही तर अनेकांना असं वाटतं की, हेल्दी राहण्यासाठी रोज एक्सरसाईज केली पाहिजे किंवा जिममध्ये जायला हवं. पण अनेक एक्सपर्ट असं सांगतात की, फिट राहण्यासाठी रोजच तासंतास एक्सरसाईज करावी असं काही नाही. त्याऐवजी आपल्या रोजच्या जगण्यातील काही सवयी बदलूनही तुम्ही फिटनेस चांगली ठेवू शकता.

तसं पहायला गेलं तर एक्सरसाईज करण्यामागचा उद्देश शरीर अ‍ॅक्टिव ठेवणं आहे. यासाठी सतत जिममध्ये जाऊन एक्सरसाईज करण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही इतरही काही गोष्टी करू शकता. जसे की, कधी कधी बिल्डींगच्या पायऱ्या चढणं आणि उतरणं, 30 ते 40 मिनिटं वॉक करणं, काम करत असताना छोटे छोटे  ब्रेक घेऊन वॉक किंवा हालचाल करणं या गोष्टीही खूप फायदेशीर ठरतात. 

एका रिपोर्टनुसार, तुम्ही शरीराची जास्त मेहनत करण्यापेक्षा किंवा जास्त स्ट्रेस घेण्याऐवजी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीतूनही तुम्ही स्वत:ला फिट ठेवू शकता. तुम्ही जर कामात जास्त वेळ बिझी राहत असाल तर या टिप्स नक्कीच तुमच्यासाठी कामात येऊ शकतात. सोबतच तुम्हाला तुम्ही शरीर निरोगी ठेवण्यासाठी वेळ देऊ शकत नाही, असा गिल्टही येणार नाही.

रोज एक्सरसाईज करणं गरजेचं आहे का?

रोज जगणं सगळ्यांचं वेगवेगळं असतं. एखाद्याला कामाला कधी जास्त उशीर लागू शकतो तर एखादं काम लवकर पूर्ण होतं. कधी जास्त कामामुळे थकवा येतो तर कधी एक्सरसाईज करण्याचा मूड नसतो. अशात एक्सपर्ट सांगतात की, रोज एक्सरसाईज केलीच पाहिजे असं काही नाही. स्वत:वर दबाव टाकण्याऐवजी शरीराची गरज समजून घेतली पाहिजे. आठवड्यातील दोन ते तीन दिवस एक्सरसाईज करूनही तुम्ही फिट राहू शकता. 

छोट्या गोष्टींचा मोठा प्रभाव

नेहमीच जिमला जाण्याची किंवा रोज खूप जास्त एक्सरसाईज करण्याची गरज नसते. रोज तुम्ही पायी चालणे, पायऱ्या चढणं-उतरणं, सतत बसण्याऐवजी उभं राहून काम करणं या गोष्टींमुळेही तुम्ही फिट राहू शकता. या गोष्टी करूनही तुम्ही बॉडी फिट ठेवू शकता आणि कॅलरी बर्न करू शकता. 

खाणं-पिणंही तेवढच महत्वाचं

शरीराचं फिटनेस चांगलं ठेवणं यासाठी केवळ एक्सरसाईज ही एकच बाब नाही. एक्सरसाईजसोबतच पौष्टिक आणि संतुलित आहार घेणंही तेवढंच महत्वाचं ठरतं. आहारात फायबर, हिरव्या पालेभाज्या, प्रोटीन आणि आयर्न यांचा समावेश असला पाहिजे. जंक फूड, शुगर असलेल्या गोष्टी टाळल्या पाहिजे. तसेच दिवसभर भरपूर पाणी पिणंही गरजेचं असतं.

आठवड्यातून 150 मिनिटं पुरेसे

हेल्दी आणि फिट राहण्यासाठी रोज दोन तास जिममध्ये घाम गाळण्याची अजिबात गरज नाही. WHO आणि हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, तुम्ही आठवड्यातून केवळ 150 मिनिटं हलकी शारीरिक हालचाल करूनही फिट राहू शकता. यासाठी तुम्ही पायी चालणं, धावणं, डान्स करणं या गोष्टी करू शकता. ही वेळ तुम्ही तुमच्या सोयीनुसार विभागून घेऊ शकता. जसे की, रोज 30 मिनिटं किंवा आठवड्यातून 5 दिवस. नियमितता महत्वाची आहे.

टॅग्स :Healthआरोग्यFitness Tipsफिटनेस टिप्स