शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अनियमित झोप देईल मेंदूच्या विकारांना निमंत्रण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 19:45 IST

पेशंट आणि डॉक्टरांनाही संशोधकांचा सावधानतेचा इशारा

ठळक मुद्देअनियमीत झोप अनेक विकारांना आमंत्रण देऊ शकते.दीर्घ काळापर्यंत जर झोपेच्या तक्रारींनी तुम्ही त्रस्त असाल, तर मेंदूवर होऊ शकतो विपरित परिणाम.एक प्रकारच्या दुष्टचक्रात तुम्ही त्यामुळे अडकता.

- मयूर पठाडेरात्री झोप न लागणं, मध्यरात्री अधून मधून उठावं लागणं.. झोपेच्या या सर्वसाधारण तक्रारी वाटल्या आणि त्याकडे आपण कायम दुर्लक्षच करीत असलो, तरी त्यामुळे आपण आपलं सुखाचं आयुष्य स्वत:हून दु:खात लोटत असतो असं संशोधकांचं म्हणणं आहे.आपल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाचं रुपांतर झोप न लागणे, झोपेच्या तक्रारींत होतं, हे सगळ्यांनाच माहीत असलं तरी या दोन्ही तक्रारी एकत्र आल्यावर त्याचा परिणाम फार मोठा असतो. हळूहळू तो वाढत जातो, ही गोष्ट मात्र अनेकांना माहीत नसते किंवां त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.आॅस्ट्रेलियातील काही संशोधकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात त्यांना लक्षात आलं, नुसती अनियमीत झोपदेखील तुमच्या अनेक विकारांना आमंत्रण देऊ शकते. संशोधकांचा सर्वात मोठा निष्कर्ष म्हणजे दीर्घ काळापर्यंत जर झोपेच्या तक्रारींनी तुम्ही त्रस्त असाल, तर तुमच्या मेंदूवर त्याचा विपरित परिणाम होतो आणि एक प्रकारच्या दुष्टचक्रात तुम्ही अडकता. मेंदूवर परिणाम म्हणून शरीरावर परिणाम होतो, तब्येतीच्या तक्रारींमुळे आजारपणांत वाढ होते. आजारपणांमुळे निद्रानाशाचा विकार जडतो आणि त्यामुळे पुन्हा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो, असं हे दुष्टचक्र आहे.या संशोधनातील प्रमुख संशोधक डॉ. कॅरोल लॅँग यांनी त्यामुळे डॉक्टरांनाही सल्ला दिला आहे, की जेव्हा झोपेच्या तक्रारीची समस्या घेऊन तुमच्याकडे पेशंट येतो, येईल त्यावेळी निद्रानाश आणि ‘आॅबस्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅपेना’ (झोपेत काही क्षणांसाठी अचानक श्वास चालू-बंद होणे) हे दोन्ही विकार पेशंटला झालेले आहेत का ते आधी तपासा. या दोन्ही तक्रारी जर रुग्णांत आढळल्या तर अशा रुग्णांची गांभिर्यानं तपासणी करा आणि त्याप्रमाणे त्यावर उपचार करा.पण झोपेच्या समस्या असतील, तर आपणही त्याकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही.