शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

अनियमित मासिक पाळीच्या समस्येने त्रस्त आहात?; 'हे' उपाय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 20:00 IST

साधारणतः महिलांच्या मासिक पाळीचे चक्र 25 ते 28 दिवसांचे असते. पण अनेकदा वेळेआधीच मासिक पाळी येते किंवा कधीकधी पाळीचे दिवस उलटून गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी येते.

साधारणतः महिलांच्या मासिक पाळीचे चक्र 25 ते 28 दिवसांचे असते. पण अनेकदा वेळेआधीच मासिक पाळी येते किंवा कधीकधी पाळीचे दिवस उलटून गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी येते. यामागे बिघडलेली लाइफस्टाइल, असंतुलित आहार आणि तणाव यांसारखी अनेक कारणं असू शकतात. पण जर मासिक पाळी अनियमित असेल तर ताण आणखी वाढतो. तसेच अनेकदा अस्वस्थ वाटू लागतं. अनेकदा डॉक्टर यावर औषधंही देत नाहीत. त्यामुळे आज आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची मासिक पाळीमध्ये उद्भवणारी अनियमिततेची समस्या दूर होऊ शकते. 

ही असू शकतात कारणं

महिलांमध्ये मासिक पाळी किंवा पिरियड्स अनियमित होणं ही एक नॉर्मल समस्या आहे. यामागे अनेक कारणं असू शकतात. धकाधकीचं दिनक्रम, असंतुलित आहार, अनिमिया, (anemia), मेनोपोज, वजन जास्त वाढणं किंवा घटनं, शरीरात होणारे हार्मोन चेंजेस इत्यादी. त्याचबरोबर मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी आणि मोनोपॉजच्या आधी हार्मोनसंबंधिच्या समस्यांमुळेही मासिक पाळीमध्ये अनियमिततेची समस्या उद्भवते. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी अनेक औषधं बाजारात उपलब्ध आहेत. परंतु त्याऐवजी घरगुती उपचार कधीही फायदेशीर ठरतात.  

हे घरगुती उपाय फायदेशीर

आपली प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणत्याही घरगुती उपायांचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं. जेणेकरून तुम्हाला योग्य परिस्थितीचा अंदाज येण्यास मदत होइल. 

तीळ आणि गुळ

गुळाला आयर्नचा उत्तम स्त्रोत मानलं जातं आणि तीळामध्ये लिग्नान (lignin) सोबतच शरीरासाठी आवश्यक असणारे फॅटी अॅसिड असतात. जे हार्मोनसंबंधी कोणतीही समस्या ठिक करण्यासाठी मदत करतात. यामुळे शरीराला उष्णता मिळण्यास मदत होते. परिणामी मासिक पाळी वेळेत येण्यास मदत होते. यासाठी एक मुठभर तीळ भाजून घ्या. त्यानंतर एक चमचा गुळासोबत बारिक करून घ्या. त्यानंतर मासिक पाळीच्या येण्याच्या दोन आठवड्यांआधी या मिश्रणाचे अनोशापोटी सेवन करा. काही महिने असं करा. फक्त गुळाच्या सेवनानेही अनियमित मासिक पाळीच्या समस्या दूर होण्यास मदत होते. या मिश्रणाचे सेवन मासिक पाळीदरम्यान करणं टाळा. 

हळदही उपयोगी

हळदीचा समावेश प्रामुख्याने मसाल्याच्या पदार्थांमध्ये करण्यात येतो. पण हिच हळद मासिक पाळीमध्ये उद्भवणारी अनियमिततेची समस्या दूर करण्यासाठीही मदत करते. एवढचं नाही तर शरीरामध्ये होणारे हार्मोन चेंजेस दूर करण्यासाठीही हळदीचा उपयोग होतो. हळदीचा इमानेगोज (emmenagogue ) गुणधर्म मासिक पाळीच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. तसेच हळदीचे अॅन्टी-इन्फ्लेमटोरी गुणधर्म मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठीही मदत करतात. यासाठी एक ग्लास दूधामध्ये चिमूटभर हळद एकत्र करा. त्यामध्ये चवीसाठी थोडीशी मध किंवा गुळ एकत्र करा. मासिक पाळीच्या सर्व समस्या दूर होइपर्यंत या दूधाचेसेवन करा. मासिक पाळीच्या सर्व समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी फायदा होइल. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWomenमहिलाFitness Tipsफिटनेस टिप्स