शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Yoga Day 2025: २१ जून हीच तारीख आंतरराष्ट्रीय योगदिनाची म्हणून निश्चित करण्यामागे काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 07:05 IST

International Yoga Day 2025 Date: यंदाही सर्वत्र योग दिनाची तयारी सुरू आहे, पण त्यासाठी २१ जून ही तारीख का निवडण्यात आली ते जाणून घ्या!

आरोग्य ही खरी संपत्ती आहे. ही संपत्ती कमावली तर इतर गोष्टीही सहज साध्य करता येतात. योगाभ्यासाचे महत्त्व जनमानसात रुजावे म्हणून पंतप्रधान मोदींनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये एक भाषण केले व त्यात ते म्हणाले, '' "योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे; ते मन आणि शरीराच्या ऐक्याचे प्रतीक आहे; मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद; विचार, संयम, पूर्तता; आणि आरोग्य कल्याणासाठी पूरक आहे. योग आपल्याला स्वतःचा शोध घेण्यास आणि निसर्गाशी जोडण्यास मदत करते. आपल्या बदलत्या जीवनशैलीत योगाभ्यास समाविष्ट करण्याच्या दृष्टीने जागतिक योग दिवस साजरा करावा आणि योग साधनेसंबंधी जनजागृती करावी." 

मोदींनी मांडलेल्या प्रस्तावाला संमती देत जागतिक योग दिन(Internation Yoga Day 2025) साजरा करावा असे ठरले, परंतु नेमका कोणता दिवस यावर चर्चा केली असता मोदींनी २१ जून ही तारीख सुचवली. कारण २१ जून हा वर्षातील मोठा दिवस असतो आणि योगाभ्यास दीर्घायुष्य देतो. १ डिसेंबर २०१४ रोजी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या १७७ सदस्यांनी २१ जून हा दिवस "आंतरराष्ट्रीय योग दिवस" ​​म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

पंतप्रधान मोदींचा हा ठराव ९० दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने मंजूर करण्यात आला. सर्वात कमी कालावधीत पूर्ण बहुमताने मंजूर होणारा तो पहिला प्रस्ताव ठरला. या उपक्रमाला अनेक जागतिक नेत्यांचा पाठिंबा मिळाला.  

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मान्यवरांसह सुमारे ३६,००० लोकांनी २१ जून २०१५ रोजी नवी दिल्ली येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ३५ मिनिटांसाठी २१ योगासने केली. या समारंभाने गिनीज बुकमध्ये विश्वविक्रम नोंदवला गेला. पंतप्रधानांच्या सक्रिय उपस्थितीमुळे योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि जगभरात लाखो लोकांनी योग दिवस साजरा केला आणि आनंदाची बाब म्हणजे आजही हा दिवस तितक्याच उत्साहाने सर्वत्र साजरा होत आहे!

यंदाही सर्वत्र योग दिनाची(Internation Yoga Day 2025) तयारी सुरू आहे. तुम्ही २१ जून रोजी योग अभ्यासाला सुरुवात करताय की नाही?

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनHealthआरोग्यYogaयोगासने प्रकार व फायदेNarendra Modiनरेंद्र मोदी