शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

International Yoga Day 2018 : फिटनेससाठी 'हा' योगाभ्यास फॉलो करतात सेलिब्रिटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 10:57 IST

हे लोक योगासनांबाबत जनजागृती करण्यासाठीही वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये सहभागी होत असतात. चला जाणून घेऊया बॉलिवूडचे कलाकार कोणत्या योगासनांना देतात प्राधान्य...

मुंबई : फिट आणि हेल्दी राहण्यासाठी सेलिब्रिटींनी आता आपल्या रुटीन वर्कआउटमध्ये योगाभ्यासाचाही समावेश केला आहे. शिल्पा शेट्टी, करिना कपूर. जॅकलिन फर्नांडिस, बिपाशा बसु यांसारखे स्टार योगासने करून आपल्या फिटनेसची काळजी घेतात. हे लोक योगासनांबाबत जनजागृती करण्यासाठीही वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये सहभागी होत असतात. चला जाणून घेऊया बॉलिवूडचे कलाकार कोणत्या योगासनांना देतात प्राधान्य...

शिल्पा शेट्टी - डोकं दुखत असल्याने घेतला होता योगसनांचा आधार

शिल्पा शेट्टीने योगासनांची सुरुवात डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी केली होती. याचे फायदे आणि परिणाम जाणून घेतल्यावर तिने योगासने केवळ फॉलोच केले नाहीतर त्याची एक सीडीही लॉन्च केली. प्रेग्नन्सीनंतर शिल्पाचं वजन खूप वाढलं होतं. पण योगाभ्यास आणि एक्सरसाईजच्या मदतीने तिने 100 दिवसात 32 किलो वजन कमी केलं होतं. याचा खुलासा सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर विनोद चन्नाने केला होता. शिल्पाला आष्टांग योगसन करणे अधिक पसंत आहे. 

जॅकलिन फर्नांडिस - 108 सूर्यनमस्कार करते जॅकलिन

(Image Credit: Gulf News)

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन रोज जिम जाण्याआधी एक तास योगासने करते. या रूटीनमध्ये ती 108 वेळ सूर्यनमस्कार करते. त्याचप्रमाणे ती नियमितपणे आष्टांग योग करते. योगभ्यासाचा जॅकलिनला किती फायदा होतो हे तिच्या इन्स्टाग्रामवरील व्हि़डीओवरुन बघता येतं. 

करिना कपूर - झिरो फिगरचं गुपित पावर आणि विक्रम योग

आपल्या झिरो फिगरसाठी प्रसिद्ध असलेली करिना कपूरही नियमित योगाभ्यास करते. करिना रोज पावर आणि विक्रम योग करते. त्यासोबतच ती 50 सूर्यनमस्कार करते. प्रेग्नन्सीनंतर पुन्हा आपल्या झिरो फिगरमध्ये येण्यासाठी करिनाला योगाभ्यासाची फार मदत झाली.  

अनिल कपूर - विक्रम योग आहे फिटनेसचं गुपित

62 वर्षीय अनिल कपूर आजही तरुणांना लाजवतील इतके फिट आहेत. त्यांच्या फिटनेस रूटीनमध्ये अनेक वर्षांपासून हॉट योगाभ्यासाचा समावेश आहे. हा योगाभ्यास 50 डिग्री तापमानात केला जातो. 

बिपाशा बसु - कॉम्बिनेशन योगाने राहते फिट

फिटनेस आयकॉन बिपाशा बसु अनेक वर्षांपासून योगाभ्यास करत आहे. वर्कआऊटबाबत वेगवेगळे प्रयोग करणारी बिपाशाने फिटनेस सीडीही लॉन्च केली आहे. बिपाशा रोज 108 सूर्यनमस्कार करते. त्यासोबतच कॉम्बिनेशन योगाभ्यासही करते. हे कार्डियो आणि योगाभ्यासाचं कॉम्बिनेशन आहे. 

नरगिस फखरी - अॅक्वा योगाभ्यासाने फिट राहते

नरगिस ही फिटनेससाठी डान्स आणि योगाभ्यास करते. ती रोज अॅक्वा योगाभ्यास करते. भारतात आल्यावर तिने योगाभ्यास करायला सुरुवात केली होती.

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनFitness Tipsफिटनेस टिप्स