शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

InspectIR COVID-19 Breathalyzer : 'या' डिव्हाइसमुळे आता अवघ्या 3 मिनिटांत श्वासाद्वारे होणार कोरोना चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 14:45 IST

InspectIR COVID-19 Breathalyzer : हे डिव्हाइस रुग्णालये आणि कोविड केंद्रांमध्ये वापरले जाऊ शकते. या डिव्हाइसच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत कोरोना व्हायरसची चाचणी केली जाऊ शकते.

गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसून येत आहे. यातच एक दिलासादायक बाब म्हणजे अमेरिकेतील फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (FDA) श्वासोच्छवासाद्वारे कोरोना ओळखू शकणार्‍या डिव्हाइसच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. हे डिव्हाइस रुग्णालये आणि कोविड केंद्रांमध्ये वापरले जाऊ शकते. या डिव्हाइसच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत कोरोना व्हायरसची चाचणी केली जाऊ शकते.

माहितीनुसार, या डिव्हाइसचे नाव इन्स्पेक्टआयआर कोविड-19 ब्रिथलायझर (InspectIR COVID-19 Breathalyzer) आहे. हे डिव्हाइस क्लिनिक, रुग्णालये आणि कोविड चाचणी केंद्रांवर वापरले जाऊ शकते. तसेच, या चाचणीचा अहवाल तीन मिनिटांत येतो. हे केवळ परवानाधारक आरोग्य सेवा प्रदात्याच्या देखरेखीखाली वापरले जाऊ शकते.

एफडीएच्या 'सेंटर फॉर डिव्हायसेस अँड रेडिओलॉजिकल हेल्थ'चे संचालक डॉ. जेफ शुरेन यांनी कोविड-19 साठी क्लिनिकल चाचण्यांमधील नावीन्यपूर्ण उदाहरण म्हणून याचे वर्णन केले. ते म्हणाले, यामुळे कोरोना व्हायरसची चाचणी मोठ्या प्रमाणात सुलभ होऊ शकते. कोविड-19 च्या बाबतीत, हे एक मोठे यश म्हणून उदयास येईल.

99.3 टक्के अचूक परिणामइन्स्पेक्टआयआर कोविड-19 ब्रिथलायझर हे डिव्हाइस कोरोना व्हायरसची लागण झालेले नमुने ओळखून 91.2 टक्के आणि नकारात्मक नमुने ओळखून 99.3 टक्के अचूक परिणाम देते, असे एफडीएने गुरुवारी सांगितले. तसेच, याद्वारे दररोज 160 नमुने तपासले जाऊ शकतात. हे नंतर वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दरमहा 64,000 नमुन्यांची चाचणी करणे शक्य होईल, असेही एफडीएने म्हटले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाHealthआरोग्य