अज्ञात दुचाकीच्या धडकेत वृद्धा जखमी
By Admin | Updated: April 5, 2016 00:15 IST2016-04-05T00:15:52+5:302016-04-05T00:15:52+5:30
जळगाव : अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने सुराटबाई चत्रसिंग राठोड (८५, रा. मोरगाव, ता. जामनेर) ही वृद्धा जखमी झाली. हा अपघात नेरी, ता. जामनेर येथे सोमवारी दुपारी झाला. सुराटबाई या बँकेमधून पैसे काढून जात असताना त्यांना अज्ञात दुचाकीने धडक दिली. अपघातानंतर दुचाकीस्वार फरार झाला. या अपघातात वृद्धेच्या कमरेला जबर मार लागला असून त्यांना १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. जुगल वाडिले व चालक सुरेंद्र चौधरी यांनी जिल्हा रुग्णालयात हलविले. वृद्धेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

अज्ञात दुचाकीच्या धडकेत वृद्धा जखमी
ज गाव : अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने सुराटबाई चत्रसिंग राठोड (८५, रा. मोरगाव, ता. जामनेर) ही वृद्धा जखमी झाली. हा अपघात नेरी, ता. जामनेर येथे सोमवारी दुपारी झाला. सुराटबाई या बँकेमधून पैसे काढून जात असताना त्यांना अज्ञात दुचाकीने धडक दिली. अपघातानंतर दुचाकीस्वार फरार झाला. या अपघातात वृद्धेच्या कमरेला जबर मार लागला असून त्यांना १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. जुगल वाडिले व चालक सुरेंद्र चौधरी यांनी जिल्हा रुग्णालयात हलविले. वृद्धेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.