शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Variant: ओमायक्रॉन BA.4 व्हेरिअंटचा भारतात पहिला रुग्ण सापडला, जाणून घ्या हा किती घातक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 20:32 IST

हैदराबादमध्ये हे पहिलं प्रकरण समोर आलं आहे. कोविड-19 जिनोमिक सर्विलान्स प्रोग्राममुळे याची माहिती मिळाली आहे.

भारतात कोरोनाच्या (Coronavirus) ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या BA.4 सबव्हेरिएंटने (Omicron Sub Variant BA.4 in India) शिरकाव केला आहे. देशात याचा पहिला रुग्ण सापडला आहे. हैदराबादमध्ये हे पहिलं प्रकरण समोर आलं आहे. कोविड-19 जिनोमिक सर्विलान्स प्रोग्राममुळे याची माहिती मिळाली आहे.

भारताच्या SARS-CoV-2  कन्सोर्टियम ऑन जीनोमिक्सशी (INSACOG)  संबंधित शास्त्रज्ञांनी सांगितलं की, भारतातील BA.4 सब व्हेरिएंटची नोंद ९ मे रोजी GISAID वर करण्यात आली आहे. हा स्ट्रेन दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या मोठ्या लाटेसाठी कारणीभूत ठरला आहे. हा संसर्ग आणि लसीकरणामुळे मिळालेल्या रोगप्रतिकारक क्षमतेलाही प्रभावित करण्यासाठी सक्षम आहे.

तज्ज्ञांच्या मते, या वर्षी जानेवारीत भारतात आलेल्या ओमिक्रॉनच्या व्हेरिएंटच्या लाटेमुळे भारतातील लोकांमध्ये चांगली आणि व्यापक प्रमाणात इम्युन रिस्पॉन्स पाहायला मिळाला. ज्यामुळे संक्रमणाची शक्यता कमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ओमिक्रॉनचा BA.4 आणि BA.5 सब व्हेरिएंट जगभरात कोरोनाची प्रकरणं वाढण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. १२ पेक्षा जास्त देशात हा सापडला आहे.

सीएनबीसीच्या मते, कोरोनाच्या WHO मधील टेक्निकल प्रमुख मारिया वान केरखोव यांनी सांगितलं की, कमीत कमी १६ देशांत BA.4 चे जवळपास 700 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. BA.5  चे ३०० पेक्षा अधिक प्रकरणं १७ देशांत आहेत. कोरोनाचे हे सब व्हेरिएंच अधिक संसर्गजन्य आहेत पण तितके घातक ठरले नाहीत.

नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की येत्या दिवसात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये जास्त वाढ होण्याची आशा नाही गंभीर कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढेल याची शक्यताही कमी आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सOmicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या