शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कॅल्शिअमची खाण आहेत 'या' काळ्या बीया, शरीरातील पूर्ण हाडे होतात मजबूत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 10:09 IST

Black Sesame Seeds : जर तुम्ही दूध पित नसाल आणि तुम्हाला कॅल्शिअमची कमतरता भरून काढायची असेल तर तुम्ही एका खास गोष्टींचं सेवन करून शकता.

Black Sesame Seeds : कॅल्शिअम आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं असतं. दूध, दही, पनीरसारख्या गोष्टींमधून आपल्या शरीराला कॅल्शिअम मिळतं. पण अनेकजण याचं सेवन करत नाहीत. ज्यामुळे हाडं मजबूत होत नाहीत. भरपूर कॅल्शिअमसाठी भरपूर दूध प्यावं लागतं. पण जर तुम्ही दूध पित नसाल आणि तुम्हाला कॅल्शिअमची कमतरता भरून काढायची असेल तर तुम्ही एका खास गोष्टींचं सेवन करून शकता. जेणेकरून तुमची हाडे मजबूत होतील. ही गोष्ट म्हणजे तीळ.

तिळामध्ये भरपूर कॅल्शिअम

तिळामध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शिअम असतं. महत्वाची बाब म्हणजे तिळाचं सेवन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. तीळ तुम्ही भाजून रिकाम्या पोटी खाऊ शकता किंवा तिळाचे लाडू बनवून खाऊ शकता. तसेच तिळाची चटणीही खाऊ शकता. इतकंच नाही तर तीळ तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमध्येही टाकू शकता. 

10 पट जास्त कॅल्शिअम

काळ्या तिळामध्ये कॅल्शिअमचं प्रमाण दुधापेक्षा जास्त असतं. 100 ml फुल क्रीम दुधातून जवळपास 123mg कॅल्शिअम मिळतं. तर तेवढच्या काळ्या तिळामध्ये 1286mg कॅल्शिअम असतं. याने हाडे मजबूत होतात आणि हाडांचा विकासही होतो.

मॅग्नेशिअम आणि फॉस्फोरस

काळ्या तिळामध्ये केवळ कॅल्शिअमच नाही तर इतरही अनेक पोषक तत्व भरपूर असतात. काळ्या तिळामध्ये मॅग्नेशिअम आणि फॉस्फोरस भरपूर असतं. जे हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचं असतं. हाडं रिपेअर करण्याचं कामही या गोष्टी करतात.

झिंक

काळ्या तिळांमध्ये झिंकही असतं. जे बोन डेंसिटी वाढवण्यास मदत करतं. यामुळे ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारापासून बचाव होतो. या तत्वामुळे हाडे कमजोर होत नाही आणि हाड मोडण्याचा धोकाही कमी होतो.

हाडांसाठी प्रोटीन

काळ्या तिळामध्ये भरपूर प्रोटीन असतं. ज्यामुळे हाडे आणखी मजबूत होतात. हाडांच्या विकासासाठी आणि रिपेअरिंगसाठी हे फार गरजेचं असतं. याने शरीरातील सगळी हाडे मजबूत होतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य