शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 06:36 IST

महामुंबईत आढळले सर्वाधिक रुग्ण, सध्या दुसऱ्या, तिमाहीतील गरोदर मातांसोबत मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना, आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. 

मुंबई - गेल्या वर्षभरात राज्यात ‘इन्फ्लुएंझा-ए’चे रुग्ण वाढले असून, एकूण ५७ रुग्णांचा या आजराने मृत्यू झाला आहे. राज्यात २,३२५ रुग्ण आढळले असून, सर्वाधिक ७७९ रुग्ण मुंबईत असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. 

आरोग्य विभागाने  १ जानेवारी ते २१ नोव्हेंबर पर्यंतची ‘इन्फ्लुएंझा’ची आकडेवारी जाहीर केली. त्यामध्ये  महामुंबई परिसरात रुग्ण आढळून आले. आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग उपयोजना करत आहेत. अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या दुसऱ्या, तिमाहीतील गरोदर मातांसोबत मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना, आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. 

यांनी काळजी घ्यावी...या लक्षणांसोबतच तीव्र घसादुखीचा त्रास होत असेल, घशाला सूज आली असेल आणि ताप ९८ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर अशा अतिजोखमीच्या रुग्णांची  (गरोदर माता, उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीचे विकार, कर्करोग, दमा असे विकार असणाऱ्या व्यक्ती)  तपासणी आवश्यक आहे. 

इन्फ्लुएंझावर उपाय काय?नागरिकांनी आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे गरजेचे आहे.संतुलित आहार करणे गजरेचे असून, त्यासोबत व्यायाम करावा. आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. भरपूर पाणी प्यावे आणि वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा. या आजाराची लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

‘इन्फ्लुएंझा’ची लक्षणे काय आहेत ?

कोरोनाच्या आजराप्रमाणेच स्वाइन फ्लूची लक्षणे आहेत. यामध्ये सौम्य आणि गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून येतात. या आजारात ताप, खोकला, घसा दुखी, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या या लक्षणांचा समावेश आहे.

‘इन्फ्लुएंझा’चे जिल्हानिहाय रुग्ण 

  •     मुंबई     ७७९ 
  •     ठाणे     २५० 
  •     मीरा-भाईंदर     १३ 
  •     नवी मुंबई     ६ 
  •     ठाणे ग्रामीण     ५
  •     कल्याण     २
  •     रायगड     १

 

 

टॅग्स :Healthआरोग्य