शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

‘चलते फिरते आग लगाओ’..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 16:20 IST

तुमच्या आरोग्याचं पहिलं आणि महत्त्वाचं रहस्य..

ठळक मुद्देकायम फिरते राहा. तुम्ही जितके चालते फिरते राहाल तितके तुम्ही फ्रेश आणि उत्साहित राहाल.कायम फिरते राहा. तुम्ही जितके चालते फिरते राहाल तितके तुम्ही फ्रेश आणि उत्साहित राहाल.आॅईली पदार्थ शक्यतो टाळता येतील तेवढा टाळा.टेक्नॉलॉजीला आपला मित्र बनवा. अनेक अ‍ॅप तुमच्या आरोग्याची काळजी घेतील.

- मयूर पठाडेकाहीही होऊ द्या, फिरून फारून सर्व गोष्टी आपल्या तब्येतीवरच येतात. सर सलामत तो पगडी पचास.. तुमचं आरोग्य चांगलं असेल तर सारं काही उत्तम.. पण हे आरोग्य उत्तम राखायचं तरी कसं? अनेक जण त्यासाठी अनेक प्रकारचे उपाय सांगतात. त्यामुळेच अनेकांना औषधापेक्षा रोग परवडला असं वाटतं आणि ते आरोग्याच्या फंदात पडत नाहीत.काय करायचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी? आज अगदी सोप्पे उपाय मी तुम्हाला सांगणार आहेत. रोजच्या रोज आणि काहीही टेन्शन घेता करता येण्यासारखे. बघा करून.आरोग्याचं रहस्य१- कायम फिरते राहा. तुम्ही जितके चालते फिरते राहाल तितके तुम्ही फ्रेश आणि उत्साहित राहाल. लहानपणी ‘छप्पापाणी’ किंवा ‘लपाछपी’ नावाचा एक खेळ खेळला जायचा. त्यावेळी लपणारी मुलं ज्याच्यावर राज्य आहे, त्याच्यासाठी घोषणा द्यायचे.. चलते फिरते आग लगाओ.. तसंच आहे. कायम चालत राहा..साधी गोष्ट आहे.. समजा तुमचा फ्लॅट इमारतीच्या दुसºया तिसºया मजल्यावर आहे. अशावेळी लिफ्टनं न जाता पायºयांनी जा. आॅफिसमध्ये छोटीमोठी कामं शिपायाला न सांगता, तुम्हीच उठून करा. निदान स्वत:ची कामं तरी..२- रोजचा कामाचा रगाडा कोणाला चुकलाय? अशावेळी कामाच्या मागे हात धुवून न लागता थोडं स्लो डाऊन करा. थोडी शांतता अनुभवा आणि मग पुन्हा कामाला भिडा.३- आहारात फॅट्स टाळा. आॅईली पदार्थ शक्यतो टाळता येतील तेवढा टाळा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहाण्यास मदत होईल.४- टेक्नॉलॉजीला आपला मित्र बनवा. उदाहरणार्थ मोबाईल. त्यात अनेक अ‍ॅप तुम्हाला डाऊनलोड करता येतील, जे तुमच्या आरोग्याची काळजी घेतील. अर्थातच मोबाईलच्या आहारी मात्र जाऊ नका.५- आपल्या ब्लड प्रेशरची नियमित तपासणी करत चला. आपलं ब्लड प्रेशर वाढलं किंवा कमी तर नाही ना झालं, याची तपासणी नियमित करीत जा.या अशा अगदी साध्या सोप्या गोष्टी. रोजच्या रोज आणि सहज करता येतील अशा. अगोदर या गोष्टींपासून तर सुरू करा. त्यानं निश्चितच फरक पडेल. तुम्हाला वाटलंच आणखी काही करायचं तर तुम्हाला त्याचा नंतरही विचार करता येईल.आरोग्याविषयीच्या आणखी काही टिप्स पाहू या पुढच्या भागात..