शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

जीवनसत्त्व, खनिजांचं महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 01:25 IST

सध्या बाजारात सगळ्या जीवनसत्त्व आणि खनिजे यांच्या गोळ्या मिळतात.. उत्तम आहे ... पण त्या केव्हा आणि कुणी घ्याव्यात यांचे काही ठोकताळे आहेत...

- डॉ. कांचन खैराटकरनमस्कार. मला नेहमी रुग्ण प्रश्न विचारतात की, अहो ..जीवनसत्त्व .. खनिजे यांना आहारात किती महत्त्व आहे? ... माझे उत्तर नेहमीच ठरलेले असते, अहो जेवण तेल.. तिखट... मिठाशिवाय जसे अपूर्ण ना तसेच जीवनसत्त्व.. खनिजद्रव्याशिवाय अपूर्णच बरं का! आपण खाल्लेल्या आहाराचे उत्तम पचन यांच्यामुळे तर होतेच आणि शरीराचे पोषणही होते... चला यांच्याविषयी आज जाणून घेऊयात का !सध्या बाजारात सगळ्या जीवनसत्त्व आणि खनिजे यांच्या गोळ्या मिळतात.. उत्तम आहे ... पण त्या केव्हा आणि कुणी घ्याव्यात यांचे काही ठोकताळे आहेत... स्वस्थ राहण्यासाठी आहारात या जीवनसत्त्व आणि खनिजे यांचा समावेश करणे अत्यावश्यक आहे. दूध घेऊन जे समाधान मिळेल... लिंबू सरबताने जी तृप्ती मिळेल अथवा गाजराच्या हलव्याने ते तोंडाला पाणी सुटेल ते कोणत्याही गोळ्यांनी मिळेल का ?सर्वप्रथम हे मान्य करायला हवे की पावभाजीचा सुवास आजही सर्वांना खेचून घेतो... गरमागरम वाफाळलेली इडली पाहूनच तोंडाला पाणी सुटते... आणि आल्याचा चहा तर परमप्रियच! म्हणूनच पेल्यातून वाटीत फिरणारा... अगदी रस्त्यावरील चहाची चव सर्वांना आपलीशी वाटते... का बरे! कारण या भारतीय भावना आहेत... आपल्या भावना आहेत.. आणि त्यांचा विचार करून आपल्याकडे पारंपरिक आहाराची बांधणी झाली... मग तो शाकाहार असो अथवा मांसाहार... त्यातील प्रत्येक घटकाने शरीराचे आणि मनाचे पोषण व्हायला हवे...असे हे तृप्तीचे... आणि पोषणाचे कामही जीवनसत्त्व आणि खनिजे करतात बरं का! चला बघूयात आजचे पहिले जीवनसत्त्व.आज आपण अ जीवनसत्त्व जाणून घेऊ.. आज एका सेकंदात मोबाईलमध्ये याची माहिती मिळेल पण मग १० जणांत ९ जणांना चष्मा... ताण असह्य होणे... असे का व्हावे ? कारण कुठेतरी पोषण कमी पडते आहे.ढोबळमानाने दूध... हिरव्या पालेभाज्या... गाजर ... नारंगी किवा पिवळ्या रंगाच्या भाज्या यामध्ये अ जीवनसत्त्व मिळते... पूर्वी रानातील माळव म्हणजे भाजी हो! आणि रवाळ घट्ट दूध ... तरीही कसदार शरीर आणि पिळदार बांधा ... आणि चातकाची नजर होती...असो ... पण आता काही बदल करून बघूयात की! गाजरहलवा... गाजराचे लोणचे... पुलाव ... पुऱ्या... पराठे.... खीस... असे किती पदार्थ होतील ना ! जेवताना चार तुकडे गाजर खाणे किंवा एखादी संत्र्याची फोड म्हणजे चौरस आहार का? हा प्रश्न स्वत:ला विचारा म्हणजे खरेखुरे उत्तर मिळेल... रसरशीत, आवडीने आणि श्रद्धापूर्वक खाणे महत्त्वाचे आहे.खूप तणाव असतील... व्यायाम खूप केला असेल... विमानाचा प्रवास... दगदगीचा व्यवसाय असेल तर अ जीवनसत्त्व अत्यावश्यक आहे... यालाच कॅरोटीन म्हटले तरीही चालेल.. त्यामुळे दृष्टी उत्तम राहते... प्रजननसंस्था उत्तम राहते... कॅन्सरला प्रतिबंध होतो आणि चेहरा सतेज होतो... पारंपरिक आहार सर्वसमावेशक आहे... त्याचा सन्मान आणि स्वीकार नक्कीच आरोग्यदायी आहे(लेखिका आयुर्वेदतज्ज्ञ आहेत)

टॅग्स :vegetableभाज्याHealthआरोग्य