शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

किडनीविकार रोखण्यासाठी असंघटीत कामगार क्षेत्रात बेल फॉर वॉटर उपक्रम राबविणे गरजेचे - अमित जैन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 16:07 IST

दगदग झाली असेल, अतिकामाचा ताण आला असेल असे वाटून या लक्षणांकडे हमखास दुर्लक्ष केले जाते. जा

ठाणे: कोरोना व्हायरसच्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर आज जागतिक किडनी दिवस साजरा होत असून आजही किडनीच्या आजारांविषयी सामान्यांना फारशी माहिती नसते. किडनीच्या आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्यातला दुसरा गुरुवार ‘जागतिक किडनी दिन’ म्हणून पाळला जातो. बहुतेक वेळा किडनीच्या आजारांची लक्षणे सुरुवातीला वेगळी ओळखू येत नाहीत. अशक्तपणा, थकवा, थोड्या कामानेही थकून जाणे, झोपेचे चक्र बिघडणे अशी लक्षणे दिसू शकतात.

दगदग झाली असेल, अतिकामाचा ताण आला असेल असे वाटून या लक्षणांकडे हमखास दुर्लक्ष केले जाते. जागतिक किडनी दिनानिमित्त मुंबईत किडनी - एक महत्वाचा अवयव"  या विषयावर डॉक्टरांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये डॉक्टर , नर्सेस तसेच डायलेसीस उपचार घेत असलेल्या रुग्णांनी सहभाग घेतला होता. याविषयी अधिक माहिती देताना 

किडनीविकारतज्ञ  डॉ अमित जैन  याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले, " आपल्या शरीरातील सर्वात दुर्लक्षित अवयव म्हणजे आपल्या दोन्ही किडन्या (मूत्रपिंडे) आहेत. सरासरी वयाच्या तिशीपर्यत अनेकांना आपल्या किडनीच्या कार्याविषयी माहिती नसते. उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, यकृताचा तीव्र आजार, मूत्रसंसर्ग, मूतखडा, संधिवात अशा आजारांच्या रुग्णांना किडनीचे आजार होण्याचा संभव अधिक असतो. त्यामुळे या रुग्णांनी त्यांच्या किडनीच्या कार्याबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे.

किडनी फेल्युअरच्या प्रमुख कारणांमध्ये ३५ टक्के वाटा हा मधुमेहाचा व १७ टक्के वाटा हा उच्च रक्तदाबाचा असून बैठी जीवनशैली याला कारणीभूत ठरत आहे. आज भारत मधुमेहाची राजधानी बनली असून गेल्या ३ ते ४ वर्षात किडनीच्या विकारांमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मूत्रपिंड हा आपल्या मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव असून साऱ्या शरीरातली दूषित द्रव्ये बाहेर काढायचे महत्त्वाचे काम निसर्गाने त्याच्याकडे सोपवलेले आहे.अनेक कारणांनी जेव्हा  कायमस्वरूपी किडन्या निकामी होतात त्यावेळी मात्र आपल्याला या दुर्लक्षित अवयवाचे महत्व कळू लागते परंतु गेल्या काही महिन्यामध्ये  भारतातील अनेक शाळांमध्ये पाणी पिण्यासाठी सुट्टी अथवा ब्रेकची नियमावली करण्यात आली असल्यामुळे लहानपणापासूनच किडनीचे आरोग्य संतुलित राहण्यास मदत होणार आहे. अशी नियमावली कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये तसेच असंघटीत कामगार क्षेत्रात करणे महत्वाचे आहे.

किडनीवरील ताण कमी करण्यासाठी व शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी प्रत्येकाने दिवसभरात ३ ते ४ लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. तुम्ही जितके अधिक पाणी पिता तितकी अधिक लघवी तुमच्या शरीरात निर्माण होते. सहाजिकच त्या लघवीसोबत शरीरातील विषद्रव्ये देखील बाहेर टाकली जातात. त्यामुळे तुमच्या किडनीवरचा भार कमी होतो व किडनी समस्या होण्याचा धोका देखील कमी होतो." 

बांधकाम तसेच छोट्या कारखान्यामध्ये व इतर असंघटीत क्षेत्रात काम करीत असलेले कामगार तसेच शेतामध्ये राबत असलेल्या विशेषतः महिलांसाठी ( ऊसतोडणी कामगार ) यांच्यासाठी  "बेल फॉर वॉटर" व"बेल फॉर युरीन"सारखे उपक्रम राबवून त्याना स्वच्छ शौचालये उपल्बध करून देणे महत्वाचे आहे, कारण या क्षेत्रातील अनेकांवर  कामाच्या व्यापामुळे व शौचालय उपल्बध नसल्यामुळे लघवी तुंबविण्याची वेळ येते व या कारणांमुळे मूत्रपिंडाला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता ४० ते ५० टक्क्यांनी वाढते. मूत्रपिंडाचा जंतूसंसर्ग (युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन) महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो आणि गरोदर स्त्रियांना या आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक असते, अशी माहिती अपेक्स हॉस्पिटल समूहाचे किडनीविकारतज्ञ  डॉ अमित जैन यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र