आयुष्यभर तरूण आणि सुंदर दिसायचं असेल तर 14 नियम काटेकोर पाळाचं
By Admin | Updated: May 31, 2017 18:32 IST2017-05-31T18:32:03+5:302017-05-31T18:32:03+5:30
जीवनात अशा 14 गोष्टी आहेत ज्या आपण नियमित पाळल्या तर वयाचा आकडा कोणताही असो आपण कायम तरूणच दिसू हे नक्की!

आयुष्यभर तरूण आणि सुंदर दिसायचं असेल तर 14 नियम काटेकोर पाळाचं
- मृण्मयी पगारे
आयुष्यभर तरूणच दिसता आलं तर? ही तर प्रत्येकाचीच इच्छा. पण ती पूर्ण करणं हे कुठे आपल्या हातात आहे? आपल्याला कितीही तरूण दिसावं असं वाटत असलं तरी काळ आपलं काम करतोच. न थांबता टिकटिकणारं घड्याळ, रोज उगवणारा सूर्य थोडीच कोणाला धरून ठेवता येतो? मग कसं कोणी कायम तरूणच दिसेल?
असं वाटत असलं तरी जीवनात अशा 14 गोष्टी आहेत ज्या आपण नियमित पाळल्या तर वयाचा आकडा कोणताही असो आपण कायम तरूणच दिसू हे नक्की!
आणि अशा नैसर्गिक तारूण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची किंवा ढीगभर कॉस्मेटिक्स आणि लोशन वापरण्याची गरज नाही.
रोजच्या जगण्यात 14 नियम पाळा आणि कायम तरूण दिसा!
कायम तरूण ठेवणारे 14 नियम
1) आपलं वय सगळ्यात आधी दाखवतात ते आपले केस. केस कायम मऊ, मुलायम आणि काळेभोर दिसावे असं वाटत असेल तर आधी केसांना तापवणं थांबवायला हवं. ड्रायरनं केस कोरडे करणं, केस कुरळे करण्यासाठी कर्लिंग आर्यन, मशिननं केस स्टे्रट करणं हे प्रकार केसांच्या बाबतीत करू नये. या गोष्टी केसांपासून चार हात दूर ठेवल्या तर केसांचं आरोग्य कायम चांगलं राहातं.
2) SPF हा घटक असलेलं क्रीम चेहेऱ्यासाठी नियमित वापरावं. SPF या घटकामुळे त्वचेला आवश्यक ते पोषण मिळतं. आणि अती नील किरणांपासून त्वचेची रक्षा होते. आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा SPF असलेलं क्रीम वापरणाऱ्यांच्या चेहेऱ्यावर सुरकुत्या पडत नाही असं अभ्यास सांगतो. SPF 30 डर्मेटॉलॉजिस्टचं मान्यताप्राप्त क्रीम आहे.
3) हातापायांची त्वचाही वयाबद्दल खूप काही सांगून जाते. म्हणूनच हातापायाच्या त्वचेला न चुकता मॉश्चरायझर मिळणं गरजेचं असतं. तरचं हातापायाच्या त्वचेचा मऊपणा आणि चमक टिकून राहाते. रोज सकाळी आंघोळीनंतर मॉश्चरायझर लावणं म्हणूनच गरजेचं आहे. डर्मेटॉलॉजिस्टनं SPF 30 मॉश्चरायझर वापरण्याचा आग्रह केला आहे.