शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

काकडी घ्याल तर, साल पाहूनच; अजिबात कडू निघणार नाही, वापरा या टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 16:16 IST

वरून हिरवीगार दिसणारी काकडी अनेकदा आतून कडू निघते आणि फेकावी लागते, त्यात पैसे वाया जाऊ नयेत म्हणून खास टिप्स लक्षात ठेवा. 

ऋतुमानानुसार खाल्लेल्या फळातून शरीराला आवश्यक पोषण मूल्य मिळतात आणि आरोग्य चांगले राहते. उन्हाळ्यात कलिंगड आणि काकडीवर आपण जास्त भर देतो. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हे दोन्ही उपाय स्वस्त आणि मस्त आहेत. अलीकडे या दोन्ही गोष्टी बारमाही मिळत असल्या तरी उन्हाळ्यात त्यांचे महत्त्व अधिक असते. पण त्यांची पारख महत्त्वाची असते. कलिंगडाची निवड कशी करावी, याची माहिती देणारा लेख आपण याआधी वाचला आहे, आज काकडीची निवड कशी करावी ते जाणून घेऊया. 

काकडी स्वस्त मिळत असली, तरी अनेकदा काकडीचा वाटा उचलल्यावर दोन चार काकड्या कडवट निघत असल्याचा आपल्याला अनुभव येतो. बाहेरून छान  टप्पोरी, डागविरहित, हिरवी काकडी आतून खराब निघू शकेल याची कल्पनाही करवत नाही. काही जण तर तोंडाची चव बिघडेल म्हणून काकडीची सुरुवातीची चकतीही खाण्यास नकार देतात. तर अनेकांच्या बाबतीत काकडीची चव बघण्यात अर्ध्याहून अधिक काकडी संपून जाते. यावर उपाय म्हणजे काकडीच्या सालीवरून तिची परीक्षा! ती कशी करायची ते जाणून घेऊया. 

काकडीचे साल 

काकडी घेताना तिचे साल नीट पाहणे गरजेचे आहे. जर काकडी गडद हिरवी असेल आणि त्यावर थोडासा पिवळसरपणा असेल तर ती काकडी ताजी समजावी आणि चवीला कडू निघणार नाही याची खात्री बाळगावी. कारण हिरव्या सालीच्या काकडी देशी किंवा गावठी काकडी म्हणून ओळखल्या जातात. ती काकडी शक्यतो कडू निघत नाही. 

काकडी मऊ नसावी

मऊ काकड्या जास्त बियांनी भरलेल्या आणि आतून गुळगुळीत असतात. अशा परिस्थितीत काकडी खरेदी करताना ती दाबून पाहणे अत्यंत आवश्यक आहे. चांगली आणि ताजी काकडी टणक असते आणि ती जून निघण्याची शक्यता नसते. 

आकारानुसार काकडी घ्या

बाजारात अनेक आकाराच्या काकड्या उपलब्ध असतात. मात्र विकत घेताना शक्यतो उंचीने छोट्या काकड्यांची निवड करावी. फार लांबसडक काकड्या घेऊ नये. गावठी काकडी एकवेळ मोठी असली तरी चालेल, पण पांढऱ्या फटक लांबसडक काकड्या अजिबात विकत घेऊ नका, त्या कडवट लागू शकतात. जाड काकड्याही घेऊ नये, मध्यम आकाराच्या काकड्या सहसा कडवट निघत नाहीत. 

अशी काकडी घेऊ नका

काकडी कुठेतरी कापली किंवा वाकलेली असेल तर ती खरेदी करणे टाळा. तसेच ज्या काकड्यांवर पांढऱ्या रेषा दिसतील. त्या काकड्या कडू निघण्याची शक्यता जास्त असते. तशा काकड्यांची खरेदी टाळावी. 

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यSummer Specialसमर स्पेशल