शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 06:09 IST

एक दिवस येतो जेव्हा बांबू अचानक काही आठवड्यांतच १०-१५ फूट उंच वाढतो. ही झेप एका दिवसातील नसते, तर वर्षानुवर्षांच्या शांत तयारीचं फळ असतं. हीच आहे 'बांबू मेंटॅलिटी.' जीवनाकडे पाहण्याची विचारसरणी काय शिकवते पाहूया...

निसर्गातील प्रत्येक झाडाची वाढ वेगळी असते. काही झाडे रोपल्यावर काही महिन्यांत उगवतात, फांद्या देतात; पण बांबू वेगळाच. बांबू लावल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे जमिनीवर काहीच बदल दिसत नाही. पाणी घातले, काळजी घेतली तरी वर काही उगवत नाही, असे वाटते; पण खरी जादू आत चाललेली असते. बांबू आपल्या मुळांना खोलवर, भक्कम पसरवत असतो. मग एक दिवस येतो जेव्हा बांबू अचानक काही आठवड्यांतच १०-१५ फूट उंच वाढतो. ही झेप एका दिवसातील नसते, तर वर्षानुवर्षांच्या शांत तयारीचं फळ असतं. हीच आहे 'बांबू मेंटॅलिटी.' जीवनाकडे पाहण्याची विचारसरणी काय शिकवते पाहूया...

संयम : यश त्वरित दिसत नाही म्हणून निराश होणं स्वाभाविक आहे; पण बांबू शिकवतो की संयम हीच ताकद आहे. जसे बांबू सुरुवातीला काही दाखवत नाही, तसे आपल्या आयुष्यातही काही काळ प्रयत्न असूनही परिणाम दिसत नाहीत. पण हा काळ व्यर्थ नसतो; हा काळ आपल्या कौशल्यांचा, सवयींचा पाया बांधण्याचा असतो. संयम ठेवल्यावरच खरी झेप मिळते.

पाया : बांबू उंच वाढतो; कारण त्याने आधी मुळे घट्ट केली असतात. तसेच, आपल्या आयुष्यातील यश टिकावू व्हायचं असेल तर पाया भक्कम असावा लागतो. हा पाया म्हणजे आपल्या कौशल्यांचा साठा, शिस्तीच्या सवयी, प्रामाणिकपणा, आरोग्य आणि नातेसंबंध.योग्य पाया नसेल तर थोडंसं यश आलं तरी ते टिकत नाही.झेप : एकदा तयारी पूर्ण झाली की बांबूसारखी झेप येते. अचानक आलेली संधी, योग्य वेळ, योग्य तयारी हे सगळं मिळून प्रगतीला वेग देते; पण या झेपेचा लाभ त्यांनाच होतो. ज्यांनी संयम ठेवून पायाभूत मेहनत केलेली असते. झेप आली की ती टिकवण्यासाठी नम्रता, शिस्त आणि व्यवस्थापन गरजेचं आहे.

यातून काय शिकावं?बांबू मेंटॅलिटी आपल्याला सांगते की, यशासाठी घाई करू नका. संयम ठेवा, पाया घट्ट करा; कारण योग्य वेळ आली की, तुमची झेप आकाशाला भिडेल. आज तुम्ही प्रयत्न करत आहात; पण परिणाम दिसत नाहीत? तर समजा, तुम्ही तुमच्या 'बांबू' टप्प्यात आहात. मुळे घट्ट करत राहा. विश्वास ठेवा. एकदा तुमचा काळ आला की, जग तुम्हाला दुर्लक्ष करू शकणार नाही.यश म्हणजे केवळ आजची कमाई नव्हे; ती आहे सातत्याने केलेल्या प्रयत्नांची झेप. बांबू आपल्याला शिकवतो. संयम ठेवा, पाया मजबूत करा आणि नंतर उंच झेप घ्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bamboo Mentality: Patience, Strong Foundation Leads to Skyrocketing Success

Web Summary : Like bamboo, success requires patience and a strong foundation. Build skills, habits, and relationships. When the time is right, growth will be rapid. Prepare diligently; your time will come.