शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ऑफिसमध्ये ओवरटाईम करत असाल तर सावधान, पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 13:17 IST

ऑफिसमध्ये खूप वेळ जागून काम करून तुम्हाला  बॉसच्या नजरेत चांगले राहायचे असते. त्यासाठी काहीवेळा तुम्ही  प्रयत्न करत असता.

ऑफिसमध्ये खूप वेळ जागून काम करून तुम्हाला बॉसच्या नजरेत चांगले राहायचं असतं. त्यासाठी काहीवेळा तुम्ही प्रयत्न करत असता. तुमच्या अशा वागण्यामुळे ऑफिसमध्ये नक्कीच फायदा होईल. तसंच तुम्हाला प्रमोशन सुध्दा मिळू शकतं. पण या सवयींचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असतो. कारण ऑफिसमध्ये लॉगिन अवर्सपेक्षा जास्तवेळ काम केल्याची सवय असल्यास गंभीर स्वरुपाचे आजार होऊ शकतात. यामुळे हायपरटेंशन म्हणजेच रक्तदाबासंबंधी समस्या उद्भवू शकतात. 

एका आठवड्यात जर तुम्ही ४९ तासांपेक्षा जास्त वेळ ऑफिसमध्ये काम करण्यासाठी थांबत असाल तर उच्च रक्तदाबाचा धोका उद्भवू शकतो.  ५ वर्किंग दिवसांप्रमाणे रोज दहा तास ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या लोकांमध्ये रक्तदाब वाढण्याचा धोका ६६ टक्क्यांनी अधिक असतो. या संबंधी एक रिसर्च करण्यात आला  होता. त्यात असं दिसून आलं की ओवरटाईम करणाऱ्या लोकांना आजार होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. या रिसर्चसाठी कॅनडामधील ३ पब्लीक इंस्टिट्यूशन्समध्ये ३ हजार ऑफिसवर्क करत असलेल्या कर्मचारी वर्गाचे निरिक्षण करण्यात आले होते. जवळपास ५ वर्ष या लोकांवर नजर ठेवण्यात आली होती.

दरम्यान यात सहभागी असलेल्या सर्व लोकांना मॉनिटरींग डिवाईस घालून ठेवण्यात आलं होतं. ज्यात त्यांच रेग्युलर रिडिंग रेकॉर्ड केलं जातं होतं. या रिसर्चमध्ये त्या व्यक्तींचं शिक्षण, ऑक्यूपेशन, स्मोकिंग स्टेटस, बीएमआय, कामाच्या तणावाची पातळी या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या होत्या. त्यांनुसार मास्क्ड हायपरटेंशन सारख्या समस्या त्या व्यक्तींना हृद्याच्या आजाराजवळ घेऊन जात असल्याचे दिसून आले.

कॉर्पोरेट ऑफिसमध्ये  कर्मचारी वर्गाला तासनतास एकाच जागी बसून काम कराव लागतं. त्यामुळे वेगवेगळे आजार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे जे एकाच जागी बसून काम करतात. त्यांनी १० मिनिटं वेळ काढून वर्कआऊट करायला हवं. त्यामुळे आजारपणापासून दूर राहता येत. नाहीतर हृदयाशी संबंधीत गंभीर आजार होण्याचा धोका असतो. त्यात मधुमेह, रक्तदाब, तसंच मानसिक आजार होण्याची सुध्दा संभावना असते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य