शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करत असाल तर चुकूनही खाऊ नका 'ही' फळं, उलटे होतील परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 17:56 IST

जर तुम्ही वजन घटवण्यासाठी दिवस आणि रात्र एक करून कष्ट करत असताना आहारामध्ये कोणत्या फळांचा समावेश करत आहात, याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.

निरोगी आरोग्यासाठी आहारात फळांचे जास्त प्रमाणात सेवन करणं लाभदायक असते, असा सल्ला आपण जवळपास सर्वांकडूनच ऐकत असतो. पण सर्वच प्रकारची फळे अधिक प्रमाणात खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाही. विशेषतः जर तुम्ही वजन घटवण्यासाठी दिवस आणि रात्र एक करून कष्ट करत असताना आहारामध्ये कोणत्या फळांचा समावेश करत आहात, याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.

केळंकेळी हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र केळ्यामध्ये केळीमध्ये पोटॅशियम, फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स असतात. त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. तसेच केळ्यात १५० कॅलरी असतात. त्यामुळे वजन वाढते.

अ‍ॅव्होकाडोअ‍ॅव्होकाडो शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असे फळ आहे. पण यामध्ये कॅलरीचं प्रमाणात जास्त आहे. एका मोठ्या अ‍ॅव्होकाडोमध्ये ३३२ ग्रॅम कॅलरी असतात. ज्यामुळे तुमचं वजन घटण्याऐवजी वाढण्यास सुरुवात होते. अ‍ॅव्होकाडोमध्ये फॅट्सही भरपूर प्रमाणात असतात. शिवाय, ज्यांची त्वचा अतिशय संवेदनशील आहे, त्यांनी शक्यतो अ‍ॅव्होकाडो खाऊ नये. कारण अ‍ॅलर्जी होण्याचा धोका आहे. अ‍ॅव्होकाडोमुळे यकृताच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. गरजेपेक्षा अधिक प्रमाणात हे फळ खाल्ल्यास पोटाच्याही समस्या उद्भवू शकतात.

मनुकाताज्या द्राक्षांच्या तुलनेत मनुकांमध्ये उलट कॅलरींचं प्रमाण जास्त असते. यामुळे वजन घटण्याऐवजी तुमचं वजन जलद गतीनं वाढेल. वजन कमी करण्यासाठी मनुक्यांचं सेवन कमी प्रमाणात करावं.

 द्राक्षद्राक्षामध्ये निसर्गतः साखरेचं प्रमाण अतिशय आहे. शिवाय भरपूर प्रमाणात फॅट्सही आहेत. यामुळेच वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर डाएटमध्ये द्राक्षांचा समावेश करू नका. १०० ग्रॅम द्राक्षांमध्ये अंदाजे 67 कॅलरी आणि 16 ग्रॅम साखरेचं प्रमाण असते. हे प्रमाण तुमच्या वजन वाढीसाठी पोषक आहे. द्राक्षांमुळे पचन प्रक्रियेवरही परिणाम होतो. जास्त प्रमाणात द्राक्षांचं सेवन केल्यास गॅसच्या समस्याही वाढतात.

आंबाआपण दररोज अमरस, मिल्कशेक्स, ज्यूस, आंबा मलई, आईस्क्रीम खाल्ले तर तुमचे वजन वाढू शकते. आंब्यात जवळपास 150 कॅलरीज असतात. जास्त कॅलरी खाल्ल्यास वजन वाढू शकते. म्हणून आंबे खाल्ल्यानंतर दुसरे काही खाऊ नये. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न