शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

या तीन लक्षणांवरून ओळखा कॉलेस्ट्रोलचा धोका, हार्टॲटकचेही ठरू शकते कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 19:23 IST

रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या वाढलेल्या प्रमाणाचा परिणाम थेट हृदयाच्या आरोग्यावर होतो. परिणाम हृदयरोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे वेळीच यावर उपाय करणे गरजेचे आहे.

कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचे फॅट आहे. याची निर्मिती यकृत (लिव्हर) मध्ये होते. आपल्या शरीराला याची गरज असते. याची निर्मिती गरजेइतकीच झाली तर आपल्या स्वास्थ्यासाठी योग्य ठरतं. पण गरजेपेक्षा अधिक निर्मिती झाल्यास ते शरीरात साठू लागते आणि अनेक आजारांना निमंत्रण देते. रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या वाढलेल्या प्रमाणाचा परिणाम थेट हृदयाच्या आरोग्यावर होतो. परिणाम हृदयरोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे वेळीच यावर उपाय करणे गरजेचे आहे. त्यासाठी कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणे माहित असणे गरजेचे आहे. तर जाणून घेऊया काही लक्षणे जी कोलेस्ट्रॉल वाढल्याचा संकेत देतात...

हात दुखणेकॉलेस्ट्रॉल वाढले की ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते. यामुळे एथेरोस्क्लेरोसिसची स्थीती निर्माण होते. त्यामुळे हात दुखु लागतात. आपल्यालाही अशी समस्या जाणवत असेल तर डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

चेहऱ्यावरील खुणातुम्हाला तुमच्या डोळ्याखाली पिवळ्या रंगाचे स्पॉट्स दिसत असतील तर तेही कॉलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण असू शकते. असे डाग जर तुम्हाला तुमच्या हाताच्या कोपरावरही दिसत असतील तर वेळीच सावध व्हा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

डोळ्यांमध्ये जाणवतात लक्षणेतुमच्या डोळ्यांमध्ये जर तुम्हाला काही बदल जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. बरेचदा हा दृष्टीरोग म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते पण, हे खरंतर कॉलेस्ट्रॉल वाढीचे लक्षण असू शकते. यात डोळ्यात बुब्बुळाच्या बाजूला विशिष्ट असा डाग दिसू शकतो. हे बरेचदा चाळीशीनंतर होते पण याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स