शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यु डासांना संपवण्यासाठी शास्त्रज्ञांनी तयार केले मादी डास, करतील डेंग्यु डासांचा संपूर्ण नायनाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 16:31 IST

शास्त्रज्ञांनी असा 'स्पेशल मॉस्किटो' (विशेष डास) तयार केला आहे जो डेंग्यू पसरवणाऱ्या डासांचा नायनाट करेल. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) अशी खास मादी डास तयार केली आहेत. ज्या अळ्यांपासून जन्माला येतात, पण त्यांना त्यांचा विषाणू नसतो.

पावसाळा येताच डासांपासून पसरणारे डेंग्यू-चिकुनगुनिया असे आजार पसरू लागतात. हे दोन्ही आजार जीवघेणे आहेत. वेळीच उपचार झाले नाही तर जीवही गमवावा लागू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात सर्वांना डेंग्यूची भीती वाटू लागते. मात्र, आता लवकरच लोकांना धोकादायक डेंग्यू आणि चिकनगुनियापासून दिलासा मिळणार आहे. खरं तर शास्त्रज्ञांनी असा 'स्पेशल मॉस्किटो' (विशेष डास) तयार केला आहे जो डेंग्यू पसरवणाऱ्या डासांचा नायनाट करेल. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) अशी खास मादी डास तयार केली आहेत. ज्या अळ्यांपासून जन्माला येतात, पण त्यांना त्यांचा विषाणू नसतो.

ICMR-VCRC चे संचालक डॉ. अश्वनी कुमार यांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितले की, वैज्ञानिकांनी एक विशेष प्रकारचा डास विकसित केला आहे जो हळूहळू डेंग्यू आणि चिकनगुनियाचा नायनाट करेल. ते म्हणाले, 'आम्ही अशा मादी डासांना सोडू जे नर डासांच्या संपर्कात येतील आणि अशा अळ्या तयार करू, ज्यात हे विषाणू नसतील. आम्ही डास आणि अंडी तयार केली आहेत आणि ती कधीही सोडू शकतात.

डेंग्यूशी लढण्यासाठी औषध नाहीICMR-VCRC च्या संशोधकांनी एडिस ऍप्टिसच्या दोन प्रजाती विकसित केल्या आहेत. या दोन्ही प्रजाती डेंग्यूचा नायनाट करतील. या वर्षी भारत सरकारने डेंग्यूचा सामना करण्यासाठी DNDI (Drugs for Neglected Diseases Initiative-(DNDI) इंडिया फाउंडेशन) सोबत करार केला आहे. सध्या डेंग्यूशी लढण्यासाठी कोणतेही औषध नाही.

डेंग्यूची लक्षणेभारतात हा रोग पावसाळ्यात झपाट्याने पसरतो. यामध्ये ताप, अस्वस्थता, उलट्या आणि शरीरात तीव्र वेदना सुरू होतात. रुग्णांमध्ये रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात. कधीकधी रुग्णामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव सुरू होतो. अशा स्थितीत अनेक अवयव काम करणे बंद करतात. शेवटी रुग्णाचाही मृत्यू होतो.

उत्तर भारतात डेंग्यूचा कहरउत्तर भारतात डेंग्यूचे प्रमाण जास्त आहे. देशाच्या राजधानीत या वर्षात आतापर्यंत डेंग्यूचे 150 रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत जानेवारीमध्ये 23, फेब्रुवारीमध्ये 16, मार्चमध्ये 22, एप्रिलमध्ये 20 आणि मेमध्ये 30 डेंग्यूचे रुग्ण आढळले. तर 11 जूनपर्यंत 15 प्रकरणे नोंदवली गेली.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdengueडेंग्यू