शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
2
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
3
शेअर मार्केट, रियल इस्टेट क्रॅश येणार? रॉबर्ट कियोसाकींचा मोठा इशारा; 'या' क्षेत्रात गुंतवणुकीचा सल्ला
4
"अजित पवार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री फडणवीस, त्यामुळे त्यांनाच मतदान करा", चंद्रकांत पाटलांचं विधान
5
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
6
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पुन्हा भाव! मात्र, चांदी घसरली; आजचे दर काय?
7
Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरांमध्ये मतभेद; आदिलच्या लग्नाला का गेला नाही उमर? दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
8
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
9
४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
10
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
11
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
12
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
13
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
14
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
15
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
16
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
17
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
18
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
19
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
20
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सतत भीती वाटते...झाेपही उडालीय! भीतीमुळे मनातील घर झोपेला पोखरतं, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 10:09 IST

झोप श्वासांसारखी शरीराची नैसर्गिक गरज आहे. मेंदू रिचार्ज करून शरीराच्या बारीक-सारीक व्यथा रोज दूर करण्याचे सामर्थ्य झोपेत आहे.

डॉ. सारिका दक्षीकर मानसोपचारतज्ज्ञ 

एक ३८ वर्षांची स्त्री निद्रानाशाची तक्रार घेऊन आली. ती इंटरव्ह्यू द्यायला एका ३२ मजली इमारतीच्या २८ व्या मजल्यावरील ऑफिसमध्ये बंद दाराच्या लिफ्टमधून गेली. जाताना सोबत मैत्रीण होती. त्यामुळे निभावले. आवडीचे क्षेत्र असल्याने इंटरव्ह्यू छान झाला. नोकरी मिळाल्याचा मेल आल्यावर मात्र भीतीने झोप उडाली. तिला लहानपणापासून अंधाराची, उंच ठिकाणांची खूप भीती वाटायची. अंधाराची भीती नैसर्गिक होती. लहाणपणी तिने एका नातेवाईकाला झाडावरून पडताना पाहिले. तेव्हापासून उंच ठिकाणांची भीती मनात बसली. कधी बंद दारांच्या लिफ्टची भीती, कधी गर्दीची भीती साचत गेली. पण योग्य उपाय झाले नाहीत. अवास्तव भीतीचा कडेलोट होऊन झोप उडाली अन् कामातून लक्ष उडालं. परिणामी आजारपण, थकवा. सतत कोणीतरी सोबत असावं लागायचं.

अनाठायी भीती (फोबिया) अनेक प्रकारची असते. गर्दीची, उंचीची, अपघाताची तसेच कुत्र्यांची, सरपटणाऱ्या प्राण्यांची, इंजेक्शनचीही असू शकते. भीतीमुळे मनातील घर झोपेला पोखरतं. मग कधी स्वप्नातून तीच भीती अनेकविध स्वरूपात समोर येते. अशा अनाठायी भीतीवर मानसोपचार आहेत हे अनेकांना माहित नसतं. अनेकदा अंधश्रद्धेचा आसरा घेतला जातो. योग्य समुपदेशन, बिहेव्हिरिअल थेरपी, प्रसंगी औषधोपचार यामुळे व्यक्ती पूर्ण बरी होऊ शकते.

झोप श्वासांसारखी शरीराची नैसर्गिक गरज आहे. मेंदू रिचार्ज करून शरीराच्या बारीक-सारीक व्यथा रोज दूर करण्याचे सामर्थ्य झोपेत आहे. अंथरुणात पडताच झोपू शकणाऱ्या व्यक्तीला नशीबवान म्हणतात. पण भीतीचं घर मनात असतं तेव्हा त्याचं प्रतिबिंब झोपेत उमटतं. तेलंगणातील दोन मुलांची आई असलेल्या एका महिलेला मुंग्यांची इतकी भीती वाटत होती की, तिने आत्महत्या केली. 

फोबियाचे प्रकारॲरॅक्नोफोबिया : कोळी पाहून किंवा त्यांच्या उपस्थितीने निर्माण होणारी भीती.ॲक्रोफोबिया : उंच ठिकाणी गेल्यावर डोके फिरणे, घाम येणे.क्लॉस्ट्रोफोबिया : बंद जागेत अडकण्याची भीती, लिफ्टमध्ये घाबरणे.ॲगोराफोबिया : गर्दी, उघडी ठिकाणे किंवा बाहेर जाण्याची भीती.हायड्रोफोबिया : पाण्याची तीव्र भीती.ऑफिडिओफोबिया : साप पाहून घाबरणे.थॅनॅटोफोबिया : मृत्यूची भीती.सोशल फोबिया : लोकांसमोर बोलण्याची, लोकांच्या टीकेची भीती.फिरॅकफोबिया : मुंग्यांची भीती.

English
हिंदी सारांश
Web Title : Constant fear disrupts sleep: Understanding phobias and their impact.

Web Summary : A woman's fear, triggered by an interview, led to insomnia. Phobias, like fear of heights or crowds, erode sleep. Therapy and medication can help overcome these anxieties, improving sleep and overall well-being. Ignoring phobias can have dire consequences.
टॅग्स :Healthआरोग्य