शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

...म्हणून लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता, वैज्ञानिकांनी केला हैराण करणारा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 10:15 IST

रिसर्चमधून समोर आलं आहे की, गेल्या ५०० वर्षांपासून लोकांमध्ये व्हिटमिन डी ची कमतरता भासत आहे. यामागचं एक अनोखं कारण समोर आलं आहे.

ज्या लोकांच्या शरीरात व्हिटमिन डी ची कमतरता नाही ते लोक कोरोना व्हायरसपासून अधिक सुरक्षित आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आले की, व्हिटॅमिन डी ची कमतरता लोकांमध्ये का झाली? का या आवश्यक व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे गंभीर आजारांचे शिकार होत आहेत? रिसर्चमधून समोर आलं आहे की, गेल्या ५०० वर्षांपासून लोकांमध्ये व्हिटमिन डी ची कमतरता भासत आहे. यामागचं एक अनोखं कारण समोर आलं आहे.

गेल्या ५०० वर्षापासून जगभरातील लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता कमी असण्याचं मुख्य कारण मानवी स्थलांतर म्हणजे मायग्रेशन हे आहे. तुम्ही म्हणाल असं कसं? तर थोडं गरम व्हायला लागलं की, लोक एसी लावतात थंड ठिकाणी जाऊन राहतात. देशातील उष्ण परिसर सोडून थंड ठिकाणी जाऊन लोक राहतात. याच स्थलांतरामुळे लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता भासत आहे. 

कदाचित तुम्हाला माहीत नसेल की, व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे कोरोना व्हायरस, हृदयासंबंधी आजार, डायबिटीस, तणाव आणि काही प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. त्यामुळे थंड प्रदेशात राहणारे लोक ही कमतरता पूर्ण करण्यासाठी समुद्र किनारी जाऊन सनबाथ घेतात. 

यूनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न डेनमार्क आणि यूनिव्हर्सिटी ऑफ कोपेनहेगनच्या संशोधकांनी एकत्र रिसर्च करून हे जाणून घेतलं की, गेल्या ५०० वर्षात लोक दक्षिण भागातून उत्तरेकडे आले आहेत. हे जगभरात झालं आहे. ज्या भागात अल्ट्रावायलेट किरणांचा प्रभाव जास्त आहे, ते भाग सोडून लोक कमी किरणांचा प्रभाव असलेल्या भागांमध्ये रोजगार शोधण्यासाठी आले. त्यामुळे त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता आली.

(Image Credit : freepik.com)

हा रिसर्च अशा लोकांवर केंद्रीत होता जे सूर्यप्रकाश जास्त असलेले भाग सोडून कमी सूर्यप्रकाशाच्या भागात गेले. या रिसर्चचा कालावधी ५०० वर्षे होता. याचं एक उदाहरण देण्यात आलं की, २०व्या शतकात अमेरिकेत ग्रेट मायग्रेशन झालं.२०व्या शतकात आफ्रिकन-अमेरिकन लोक अमेरिकेच्या दक्षिण भागातून उत्तर भागात गेले. रोजगार आणि जीवन स्तर सुधारणे हे यामागचं कारण होतं. सोबत रंगभेदामुळे सुरू असलेली गरिबी दूर करणे. पण लोकांनी या भागात शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांवर लक्ष दिलं नाही. 

उदाहरण द्यायचं तर अमेरिकेतील जॉर्जियापासून न्यूयॉर्ककडे जाल तर अल्ट्रावायलेट किरणांमध्ये ४३ टक्के घट होते. केवळ इतक्यानेच शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता होऊ शकते. जॉर्जिया ते न्यूयॉर्कचं अंतर साधारण १४७४ किलोमीटर इतकं आहे. म्हणजे भारतात पुणे ते दिल्लीचं अंतरही इतकंच आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, तुमच्यात किती व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल.

व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात तेव्हाच जास्त निर्माण होतं जेव्हा तुम्ही सूर्यप्रकाशात जाता. त्यामुळे सूर्यप्रकाशात राहणं गरजेचं आहे. लोक अनेक महिने एसी, घर, ऑफिसात काम करतात. ते उन्हात कधीच जात नाही. म्हणून त्यांना व्हिटॅमिन डी ची कमतरता भासते. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या