शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

मिठात 'ही' एक गोष्ट मिक्स करून दातांवर लावाल तर दूर होईल कीड आणि असह्य दुखणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 11:04 IST

Tooth Cavity Home Remedies : तुम्ही दातांच्या कीडण्यामुळे किंवा कॅव्हिटीमुळे हैराण असाल तर एक घरगुती उपाय करू शकता. ज्यामुळे दात चांगले राहतील आणि तुम्हाला आरामही मिळेल. 

Tooth Cavity Home Remedies : दातांची योग्यपणे काळजी घेतली नाही तर दातांना कीड लागते आणि दात कमजोर होतात. तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने दातांसंबंधी अनेक समस्यांचा धोका वाढतो. जसे की, दातांमध्ये कीड लागणे, हिरड्यांमधून रक्त येणे, दात दुखणे, दात पिवळे होणे आणि तोंडाची दुर्गंधी येणे. अशात तुम्ही दातांच्या कीडण्यामुळे किंवा कॅव्हिटीमुळे हैराण असाल तर एक घरगुती उपाय करू शकता. ज्यामुळे दात चांगले राहतील आणि तुम्हाला आरामही मिळेल. 

दातांची कीड घालवण्याचे घरगुती उपाय

लसूण

दातांची कीड कमी करण्यासाठी आणि यामुळे होणारी वेदना दूर करण्यासाठी तुम्ही लसणाचा वापर करू शकता. दातांच्या कीडीवर लसणामधील अ‍ॅंटी-बायोटिक आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण प्रभावी ठरतात. याने दातांमधील इन्फेक्शन कमी होतं. यासाठी लसूण बारीक करून यात थोडं मीठ टाका. हे मिश्रण कीड लागलेल्या दातावर काही वेळ लावून ठेवा. नंतर पाण्याने गुरळा करा.

लवंग तेल

लवंग ही वेगवेगळ्या समस्यांवर गुणकारी मानली जाते. दातांची दुखणं दूर करण्यासाठी याचा भरपूर वापर केला जातो. एनेस्थेटिक आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुणांमुळे लवंगाचं तेल दातांना आराम देतं. याने मांसपेशी काही वेळासाठी सुन्नही होतात. ज्यामुळे दातांमध्ये होणारी वेदना कमी होते.

मिठाचं पाणी

नॅचरल अ‍ॅंटी-सेप्टिकसारखा मिठाच्या पाण्याचा वापरही केला जाऊ शकतो. मिठाच्या पाण्याने दातांच्या कीडीमुळे होणारी वेदना कमी करतं. यासाठी एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मीठ टाका. या पाण्याने काही वेळ गुरळा करा. याने दातही स्वच्छ होतील आणि कीड कमी होण्यासही मदत मिळेल.

हळद पेस्ट

दातांची कीड दूर करण्यासाठी हळदीची पेस्टही खूप फायदेशीर ठरते. हळदीची पेस्ट तयार करण्यासाठी थोडी हळद घ्या, त्यात थोडं पाणी किंवा मोहरीचं तेल मिक्स करून पेस्ट तयार करा. या पेस्टने दातांची सफाई तर होईलच, सोबतच दातांचं दुखणंही दूर होईल. इतकंच नाही तर दातांना लागलेली कीडही दूर होईल. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य