शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

फळं आणि भाज्यांवरील पेस्टिसाइड्स कसे काढाल? पावसाळ्यात वापरा ही पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 15:28 IST

Health Tips : आजकाल कीटकनाशक औषधांचा आणि रसायनिक खतांचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे कितीही पौष्टिक भाज्या असल्या तरी त्या कीटकनाशक औषधांमुळे अधिक नुकसानकारक होतात. 

Health Tips : पावसाळा आला की, हिरव्या पालेभाज्या आणि फळं खाण्यावर काही प्रमाणात बंदी येते. कारण या दिवसात वरच्या पाण्यामुळे भाज्यांवर आणि फळांवर अनेक घातक कीटक असतात. हे तर सर्वांनाच माहीत आहे की, बाजारात मिळणारी फळ आणि भाज्या पेस्टीसाइडयुक्त असतात. आजकाल कीटकनाशक औषधांचा आणि रसायनिक खतांचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे कितीही पौष्टिक भाज्या असल्या तरी त्या कीटकनाशक औषधांमुळे अधिक नुकसानकारक होतात. 

बाजारात भाज्या किंवा फळं चमकवण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ असे पेस्टीसाइड असतात ज्यामुळे कॅन्सरसारखा आजारही होऊ शकतो. फक्त पाण्याने धुवून फळं किंवा भाज्या स्वच्छ होत नाहीत. फळ आणि भाज्या चांगल्याप्रकारे स्वच्छ करण्यासाठी खास पद्धत वापरावी लागते. 

पेस्टीसाइड्स काढण्याची पद्धत

फळं आणि भाज्या जर केवळ पाण्याने स्वच्छ करत असाल तर हे घातक ठरू शकतं. पाण्याने फळं आणि भाज्यांवरील धूळ-माती तर स्वच्छ होते, पण पेस्टीसाइड आणि कीटकनाशक औषधांचा प्रभाव पूर्णपणे दूर होत नाही. एक्सपर्ट सांगतात की, पेस्टीसाइड योग्यप्रकारे स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिश्रित करुन भाजी किंवा फळं स्वच्छ करणे अधिक चांगलं ठरेल.

रिसर्च काय सांगतो?

जर्नल ऑफ अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅन्ड फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित एका शोधानुसार, बेकिंग सोड्याचा वापर करुन कीटकनाशक आणि पेस्टीसाइड्सचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. बेकिंग सोडा पाण्यात टाकून त्यात फळं आणि भाज्या एक मिनिटांसाठी ठेवल्या तर पेस्टीसाइड्सचा प्रभाव दूर होतो. जर जास्त पेस्टीसाइड्सचा उपयोग केला गेला असेल तर पाणी बेकिंग सोड्यामध्ये फळं आणि भाज्या १० ते १५ मिनिटांसाठी भिजवून ठेवाव्यात. 

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा एकप्रकारे सोडियम बायकार्बोनेट असतं, जे कीटकनाशक औषधे आणि पेस्टीसाइड्सला स्वच्छ करण्याच्या कामात येतं. पेस्टीसाइड्सचं सर्वात प्रचलित रुप थायबेंडाजोल आणि फॉस्फेट याने सहजपणे स्वच्छ करता येतं. पण काही फळांच्या आता फळं लवकर पिकण्यासाठी किंवा रोग नष्ट करण्यासाठी कीटकनाशक औषध इंजेक्ट केलं जातं. हे कीटकनाशक बेकिंग सोड्याच्या मदतीने साफ केलं जाऊ शकत नाही. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य