शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शरीरात Uric Acid वाढल्यावर होतात या गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 10:14 IST

Uric Asid : यूरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढलं तर याने सांधेदुखी, किडनीची समस्या, हार्ट अटॅक अशा गंभीर समस्या होऊ शकतात. अनेकदा असंही होतं की, यूरिका अ‍ॅसिड क्रिस्टलचं रूप घेतात आणि जॉइंटजवळ जमा होतात. ज्यामुळे जॉइंटमध्ये वेदना होऊ लागतात.

आजकाल यूरिक अ‍ॅसिडची समस्या फारच कॉमन झाली आहे. ज्यामुळे जुने आजार पुन्हा डोकं वर काढतात. खराब लाइफस्टाईल, चुकीचं खाणं-पिणं, पाणी कमी पिणं आणि कॅलरी जास्त असलेल्या पदार्थांचं सेवन यामुळे शरीरात यूरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढतं. यूरिक अ‍ॅसिड शरीरात जमा होतं. रक्तात जर यूरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढलं तर याने सांधेदुखी, किडनीची समस्या, हार्ट अटॅक अशा गंभीर समस्या होऊ शकतात. अनेकदा असंही होतं की, यूरिका अ‍ॅसिड क्रिस्टलचं रूप घेतात आणि जॉइंटजवळ जमा होतात. ज्यामुळे जॉइंटमध्ये वेदना होऊ लागतात.

शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढण्याची कारणं...

- रात्री जास्त खाणं

- खराब लाइफस्टाईल

- पाणी कमी पिणे

- वेळेवर न जेवणे आणि न झोपणे

- जास्त नॉनव्हेज खाणं

- स्ट्रेस

यूरिक अ‍ॅसिड वाढल्याने होणाऱ्या समस्या

गाउट - गाउट संधिवाताचं एक रूप आहे. या स्थितीत शरीरात जॉइंटमध्ये वेदना होऊ लागतात. कारण यूरिक अ‍ॅसिड जॉइंट आणि टिश्यूजमध्ये तयार होतं. ज्यामुळे सूज आणि वेदना होतात. गाउट सामान्यपणे पायाच्या अंगठ्याचे जॉइंट, टाचा आणि गुडघ्यांना प्रभावित करतं.

किडनीची समस्या - किडनी यूरिक अ‍ॅसिड सोबतच रक्तातील अनेक विषारी पदार्थ फिल्टर करतात. यूरिक अ‍ॅसिड किडनीला नुकसान पोहोचवतं. यामुळे रक्तात जास्त यूरिक अ‍ॅसिड जमा होऊ लागतं.

कशाचं करू नये सेवन?

गोल्डन मनुके - मनुके द्राक्षांपासून तयार होतात. ज्यात प्यूरीन असतं. प्यूरीनच्या सेवनाने गाउट (आर्थारायटीस) ची समस्या आणखी वाढू शकते आणि याने रक्तात यूरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढतं. गाउटच्या रूग्णांची ड्राय फ्रुट टाळले पाहिजे.

चिंचेचं पाणी - चिंचेच्या रसाचे अनेक फायदे आहेत. पण गाउटने पीडित लोकांनी याचं सेवन करू नये. फ्रक्टोजचं जास्त सेवन केल्याने यूरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढतं. ज्याचे परिणाम चांगले होणार नाहीत.

सफरचंद - सफरचंदामध्येही फ्रक्टोज भरपूर असतं. अशात गाउटच्या स्थितीत सफरचंद अधिक खाणं घातक ठरू शकतं.

खजूर - खजूरामध्ये कमी प्यूरीन असतं. पण यात फ्रक्टोजचं प्रमाण जास्त असतं. अशात खजूर जास्त खाणंही घातक आहे कारण याने रक्तात फ्रक्टोजचं प्रमाण वाढतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य