शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लिव्हरला कधीच समस्या होऊ द्यायच्या नसेल तर काय खावं? जाणून घ्या बेस्ट उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 18:04 IST

लिव्हर आपल्या शरीरातील रक्त प्रक्रिया नियंत्रित करण्यासही मदत करतं त्यातून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात.

शरीरातील सगळ्याच अवयवांचं आपापलं महत्वाचं काम आहे. त्यातीलच एक महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. पचनक्रिया, मेटाबॉलिज्म, इम्यूनिटी आणि पोषक पदार्थांचं स्टोरेज यात महत्त्वाची भूमिका लिव्हरची असते. तसेच लिव्हर आपल्या शरीरातील रक्त प्रक्रिया नियंत्रित करण्यासही मदत करतं त्यातून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात.

शरीरात लिव्हर काय करतं?

शुगरच्या स्वरूपात ऊर्जा साठवणं, जीवनसत्त्वे, लोह, क्षार यांचा साठा करणे अशी कामे लिव्हर पार पाडतं. त्यासोबतच निकामी झालेल्या लाल रक्त पेशींवर प्रक्रिया करणे, आतड्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारे जंतू नष्ट करणे, निकामी हिमोग्लोबिनवर प्रक्रिया करून त्यापासून बिलिरुबिनची निर्मीती करणे, तसेच पित्त रस तयार करून त्या व्दारे स्निग्ध पदार्थांचे पचन करणे. आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणाचं कामही लिव्हर करतं.

अशात लिव्हर हा अवयव निरोगी ठेवणं आपल्यासाठी फार गरजेचं असतं. कारण या समस्यांमुळे शरीरात इतरही अनेक समस्या होतात. ज्यामुळे तुमच्या जीवाला धोकाही होऊ शकतो. अशावेळी काही असेही नैसर्गिक उपाय आहेत ज्यांव्दारे तुम्हाला लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत मिळू शकते.

लसूण

लिव्हर साफ करण्यासाठी लसूण फायदेशीर आहे. याने लिव्हरमधील एंजाइम्सला अॅक्टिव्हेट करण्यास मदत मिळते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. सोबतच यात एलिसिन आणि सेलेनियम नावाचे दोन नैसर्गिक कपांऊड आढळतात, जे लिव्हर-क्लीनिंग प्रोसेस आणखी चांगली करतात. त्यासोबतच लसूण कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड लेव्हल्सला कमी करतो. 

पपनस

पपनस ही एक लिंबू वर्गीय वनस्पती आहे. रूटेसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सिट्रस मॅक्झिमा असे आहे. याला इंग्रजीमध्ये पोमेलो असे म्हणतात. पपनसमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, पेक्टिन आणि अ‍ॅंटीऑक्सिडेंट्स आढळतात जे लिव्हर क्लीनिंग प्रोसेसमध्ये मदत करतात. सोबतच यात ग्लूटेथिओन नावाचं प्रभावी अ‍ॅंटीऑक्सिडेंट आढळतं जे फ्री रेडिकल्स निकामी करतं आणि लिव्हरला डिटॉक्सीफाय करतं. 

बीट

बीट हे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आणि याच्या क्रिया व्यवस्थित होण्यासाठी मदत करतं. यात भरपूर प्रमाणात प्लांट फ्लावनॉयड्स आणि बीटा-कॅरोटीन आढळतात जे लिव्हरची क्रिया ठिक करतं. सोबतच बीट हे रक्त शुद्ध करण्यासाठीही फायदशीर फळ आहे. त्यामुळे रोज जेवण करताना या आहारात समावेश करावा. 

लिंबू

लिंबू पाणीही लिव्हर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतं. कारण यात डी-लायमोनीन अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतं. तसंच लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे लिव्हरला पचनक्रिया वाढवणारे एंजाइम्स तयार करण्यास मदत करतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य