शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

या फळांमुळे नसा आणि रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल होईल कमी, हार्ट अटॅकचा टळेल धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 14:33 IST

Fruits For Cholesterol Patients: कोलेस्ट्रॉल वाढण्याचं कारण साधारणपणे अनहेल्दी डाएट, प्रोसेस्ड फूड्स आणि बाहेरचे तळलेले पदार्थ, शुगर असलेले पदार्थ आणि लो फायबर फूड्स हे मानलं जातं.

Fruits For Cholesterol Patients: मानवी शरीरात म्हणजे तुमच्या रक्तात लो डेंसिटी असलेल्या लिपोप्रोटीनचं प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका वाढतो. याला नियंत्रणात ठेवण्यासाठी आधी तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की, हे शरीरात कुठून येतं. याचे दोन स्त्रोत आहेत. पहिला म्हणजे तुमचा आहार आणि दुसरा म्हणजे तुमचं लिव्हर याची निर्मिती करतं. अशात हाय कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही काही फळांचं सेवन करू शकता ज्याने तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या भासणार नाही.

कोलेस्ट्रॉल वाढण्याचं कारण साधारणपणे अनहेल्दी डाएट, प्रोसेस्ड फूड्स आणि बाहेरचे तळलेले पदार्थ, शुगर असलेले पदार्थ आणि लो फायबर फूड्स हे मानलं जातं. त्यासोबतच स्मोकिंग, अल्कोहोलचं जास्त सेवन, एक्सरसाइजची कमतरता, हाय ब्लड प्रेशर किंवा डायबिटीसमुळेही ही समस्या होऊ शकते. अशात हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही फळांचं सेवन फायदेशीर ठरतं. ज्यातून तुम्हाला व्हिटॅमिन्स, मिनरल आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स मिळतील.

1) आंबट फळं - आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. यात अॅंटी-ऑक्सिडेंटही असतात जे नुकसानकारक LDL कोलेस्ट्रॉल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करतात आणि हेल्दी कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात. तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, व्हिटॅमिन सी हार्ट डिजीज आणि ब्लड प्रेशरचा धोका कमी करतात. अशात ही फळं आवर्जून खावीत.

2) अॅवोकाडो - अॅवोकाडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट असतं. जे हार्टसाठी फायदेशीर असतं. अॅवोकाडो हाय डेसिंटी असलेल्या लिपोप्रोटीन आणि लो डेंसिटी असलेल्या लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल दोन्हीची तुलना संतुलित करतं.

3) जांभळं - जांभळांमध्ये फायटोन्यूट्रिएट्स असतात जे तुमच्या हार्टसाठी फायदेशीर असतात. तसेच कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यास मदत करतात. जांभळाचा कोणत्याही प्रकारे आहारात समावेश केला तर तुम्ही तुमच्या शरीरात हेल्दी कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करू शकता.

4) केळी - केळीमध्ये फायबर, व्हिटॅमिन आणि अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स सोबतच सुक्रोज, फ्रक्टोज आणि ग्लूकोजसारखं शुगर असतं. केळी पोटॅशिअम आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहे. ज्याने कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत मिळते.

5) फायबर फूड - फायबर असलेले फूड्स किंवा फळं हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत करतात. फळांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं, ज्याला मेडिकल भाषेत पेक्टिन म्हटलं जातं. याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. फायबर भरपूर असलेल्या सफरचंद आणि नाशपाती सारख्या फळांचं नियमितपणे सेवन करा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य