शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पांढरे केस मुळापासून काळे करतात हे उपाय, एकदा कराच मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 11:51 AM

White Hair: हे उपाय करून केस नैसर्गिक पद्धतीने काळे होतात. या उपायांचा प्रभाव हळूहळू दिसतो, पण केस मुळापासून काळे होतात.

White Hair: आजकाल वेगवेगळ्या कारणांनी कमी वयातही अनेकांचे केस पांढरे होतात. लोक वेगवेगळे उपाय करून केस काळे करण्याचा प्रयत्न करतात. पण सगळ्यांना फायदा मिळतोच असं नाही. केमिकल असलेले हेअर डाय लावले तर केस आणखी खराब होतात. अशात आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून केस नैसर्गिक पद्धतीने काळे होतात. या उपायांचा प्रभाव हळूहळू दिसतो, पण केस मुळापासून काळे होतात.

मोहरीचं तेल - जर योग्यपणे वापर केला तर मोहरीच्या तेलाने केसांचा रंग गडद होतो. या तेलामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन्स आणि खनिज असतात. जे मेलानिनचं प्रमाण वाढवतात. मेलानिनमुळे केसांचा रंग आणखी डार्क होतो. मोहरीचं तेल हलकं गरम करा आणि केसांच्या मुळात हलक्या हाताने मालिश करा. हे तेल केसांना अर्धा तास लावून ठेवा त्यानंतर केस धुवावे. आठवड्यातून 2 वेळा हा उपाय कराल तर प्रभाव दिसू लागेल.

चहा पावडर - चहा पावडर पाण्यात टाकून उकडून घ्या. हे पाणी थंड करून केसांना लावून ठेवा. अर्ध्या तासानंतर केस धुवून घ्या. काही दिवस जर असंच चहा पावडर केसांना लावलं तर पांढरे केस काळे होणं सुरू होतील.

कॉफी - चहा पावडरप्रमाणे कॉफीचाही पांढऱ्या केसांवर प्रभाव दिसतो. कॉफी केसांवर लावल्यानंतर अर्धा तास ठेवा आणि नंतर केस धुवून घ्या. याने केसांचा रंग आणखी डार्क होईल.

बदामाचं तेल आणि लिंबू पाणी -  व्हिटॅमिन ई असलेल्या बदामाच्या तेलात लिंबाचा रस मिक्स करून 40 ते 50 मिनिटांसाठी केसांना लावून ठेवा. याने डोक्याच्या त्वचेला पोषण मिळेल आणि पांढरे झालेले केस काळेही होतील.

कढीपत्ते आणि खोबऱ्याचं तेल - एका वाटीमध्ये खोबऱ्याचं तेल घ्या आणि यात काही कढीपत्त्याची पाने टाकून तेल गरम करा. या तेलाने केसांची मालिश करा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा. याने केसांना बीटा कॅरोटीन आणि प्रोटीन मिळतं. तसेच याने केसगळतीही कमी होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHair Care Tipsकेसांची काळजी